सोलापूर : शहरातील बी-टू कराच्या कक्षेत असलेल्या तब्बल ८१३ मिळकतींना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने प्रभावित नागरिकांनी शासनाच्या निर्णयाचे स्वागत करत जल्लोष साजरा केला. निर्णयानंतर संबंधित चाळींमध्ये फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. नागरिकांनी एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. या यशामागे सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार देवेंद्र कोठे यांचे नागरिकांनी विशेष आभार मानले.

यावेळी बोलताना नगरसेवक विनोद भोसले म्हणाले, “बोले तैसा चाले , त्याची वंदावी पावले या म्हणीप्रमाणे आमदार देवेंद्र कोठे यांनी कामगार चाळीतील रहिवाशांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली मागणी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून मार्गी लावली. त्यामुळे हजारो नागरिकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.”
या प्रसंगी नगरसेवक विनोद भोसले, सामाजिक कार्यकर्ते नागेश खरात, विजय भोईटे, लक्ष्मण जगताप, शिवानंद कटीकर, पंढरीनाथ ताटे, सूर्यकांत शिरसागर, प्रदीप सावंत, दत्ता कोळी, रोहित खताळ, शाहू सलगर, बसू कोळी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

















