
त्या प्रमाणे मुदत संपूनही अतिक्रमणे हटविली गेली नसल्याने अतिक्रमण निर्मुलन पथक प्रमुख अकलुजचे मुख्याधिकारी साचिन पाटील, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे खाते, महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष सावंत तसेच अकलुज पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षण निरज उबाळे, पोलिस उपनिरिक्षक विक्रमसिंह साळुंखे आपला सर्व फौज फाट्या बरोबरच दोन जेसीबी , ट्रॅक्टर घेवून मंगळवार दि . १४ जुलै रोजी सकाळी ११ वा .दाखल झाले . सुरुवातीस हद्दीवरून शंका निर्माण झाल्या त्या प्रमाणे जागा मोजण्यात आली . त्यानंतर पो . उपनिरिक्षक साळुंखे यांनी ध्वनीक्षेपका वरून सर्वांना सुचना देवून शासकीय कामात अडथळा न आणणेचे आवाहन केले अन्यथा अटक व गुन्हे दाखल होतील असे बजावले . परंतु प्रशासनाची कार्यवाही सुरु होण्या पूर्वी याठीकाणी महाळुंग – श्रीपूर नगर पंचायतीचे उपनगराध्यक्ष भिमराव रेडे – पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेस (श . प . गट )चे कार्याध्यक्ष रवी पाटील यांनी प्रशासनाचे अधिकारी यांचेशी संवाद साधताना जेसीबी चा वापर न करता व्यवसायिकांना दु .४ वाजे पर्यंत मुदत द्या ते स्वतः अतिक्रमणे काढतील कारण त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होणार नाही असे सांगितले यावर ही सुचना मान्य केली गेली . यानंतर व्यवसायिकांनी स्वःता हूनअतिक्रमणे काढणेस सुरवात केली या मुळे प्रशासना वरील ताण कमी झाला .



















