सोलापूर – जिल्हा परिषद सोलापूरच्या बांधकाम विभाग क्रमांक १ अंतर्गत सन २०२५-२६ मधील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत कामांच्या प्रगतीचा सकारात्मक चित्र समोर आले. बांधकाम समितीच्या १७ जुलै २०२६ रोजी झालेल्या बैठकीत २४ जूनच्या तुलनेत अनेक योजनांतील पूर्ण झालेल्या कामांची संख्या वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने विकासकामांना दिलेली गती स्पष्ट झाली आहे.
बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील इमारती, नवीन शाळा खोल्या, शाळा दुरुस्ती, नवीन अंगणवाड्या, अंगणवाडी दुरुस्ती, पशुवैद्यकीय दवाखाने, ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कामांचा तालुकानिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला. अनेक कामे पूर्णत्वास गेली असून प्रगतीपथावरील कामांची संख्याही वाढली आहे. निविदा प्रक्रियेलाही गती मिळाल्यामुळे उर्वरित कामे लवकर सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
विशेषतः नवीन शाळा खोल्या, शाळा दुरुस्ती आणि अंगणवाडी बांधकामांच्या कामांमध्ये लक्षणीय प्रगती झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुरक्षित व दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कामांना प्राधान्य देण्यात आले आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रे व पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींच्या कामांनाही गती मिळत असल्याने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
कोट
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र.१ अंतर्गत येणारे काही कामे अद्याप निविदा प्रक्रियेत असून काही कामे इतर योजनांमधून मंजूर झाल्यामुळे त्यांची स्वतंत्र अंमलबजावणी सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यांना रखडलेल्या कामांबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या असून मंजूर सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आल्याचे बांधकाम विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता आसिफ खैरदी यांनी सांगितले.
चौकट
जिल्हा परिषद बांधकाम समितीने प्रत्येक तालुक्यातील प्रलंबित कामांचा स्वतंत्र आढावा घेत संबंधित अभियंत्यांना कामांचा वेग वाढविण्याचे निर्देश दिले. गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात येत असून नागरिकांना विकासकामांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
कोट
ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने हाती घेतलेल्या या विकासकामांमुळे शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
– इंद्रजीत पवार, उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम विभाग जि प सोलापूर
चौकट
जिल्हा परिषद सोलापूर – बांधकाम विभाग क्र. १
दि. २४ जून २०२६ ते दि. १७ जुलै २०२६ कामांचा प्रगती आढावा
मुख्य इमारत बांधकाम (५०५४-२०८१)
• एकूण कामे : १२५ • २४ जूनपर्यंत पूर्ण : २७ • १७ जुलैपर्यंत पूर्ण : ३२ • प्रगतीत : ५४ → ५२ • निविदा प्राप्त : २८ → २९ • निविदा अप्राप्त : १६ → ११ • रद्द/इतर योजनेत मंजूर : ० → १
विशेष बांधकाम (५०५४-४३३५)
• एकूण कामे : १० • २४ जूनपर्यंत पूर्ण : ७ • १७ जुलैपर्यंत पूर्ण : ६ • प्रगतीत : १ • निविदा प्राप्त : २ → ३ • निविदा अप्राप्त : ० → १
नवीन शाळा वर्ग खोल्या
• एकूण कामे : ९६ • २४ जूनपर्यंत पूर्ण : ४ • १७ जुलैपर्यंत पूर्ण : ६ • प्रगतीत : ३५ → ३३ • निविदा प्राप्त : २९ → ३४ • निविदा अप्राप्त : २६ → २१ • रद्द/इतर योजनेत मंजूर : २
शाळा दुरुस्ती
• एकूण कामे : १४५ • २४ जूनपर्यंत पूर्ण : ९ • १७ जुलैपर्यंत पूर्ण : १० • प्रगतीत : ५२ → ६१ • निविदा प्राप्त : २३ → २८ • निविदा अप्राप्त : ६० → ४५ • रद्द/इतर योजनेत मंजूर : १
नवीन अंगणवाडी
• एकूण कामे : ३९ • २४ जूनपर्यंत पूर्ण : १६ • १७ जुलैपर्यंत पूर्ण : १८ • प्रगतीत : ११ → १९ • निविदा प्राप्त : १२ → १०
अंगणवाडी दुरुस्ती
• एकूण कामे : ५३ • २४ जूनपर्यंत पूर्ण : १ • १७ जुलैपर्यंत पूर्ण : ९ • प्रगतीत : १२ → १६ • निविदा अप्राप्त : ३७ → २७
पशुवैद्यकीय दवाखाने
• एकूण कामे : १२ • २४ जूनपर्यंत पूर्ण : ३ • १७ जुलैपर्यंत पूर्ण : ३ • प्रगतीत : २ → ३ • निविदा प्राप्त : ५ • निविदा अप्राप्त : २ → १
‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र विकास
• एकूण कामे : ४५ • २४ जूनपर्यंत पूर्ण : ६ • १७ जुलैपर्यंत पूर्ण : ८ • प्रगतीत : १३ → १५ • निविदा प्राप्त : ११ • निविदा अप्राप्त : १२ → ८ • रद्द/इतर योजनेत मंजूर : ३
प्राथमिक आरोग्य केंद्रे
• एकूण कामे : २८ • २४ जूनपर्यंत पूर्ण : ४ • १७ जुलैपर्यंत पूर्ण : ५ • प्रगतीत : १९ → २० • निविदा प्राप्त : ३ • निविदा अप्राप्त : २