वैराग – रोजचे घरकाम, संसार आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांना स्वतःसाठी वेळ काढणे कठीण होते. याच धकाधकीच्या आयुष्यातून महिलांना वर्षभराचा ताणतणाव विसरून स्वतःसाठी एक दिवस बिनधास्त जगता यावा, तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘एकता महिला मंच’च्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी “श्रावणसरी जल्लोष मैत्रिणींचा २०२६” या भव्य एक दिवसीय ट्रिपचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या रविवार, दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत वैरागपासून ३ किमी अंतरावरील नांदणी रोड येथील निसर्गरम्य ‘प्रशांजली ॲग्रो टुरिझम’ येथे हा सोहळा पार पडणार आहे.
वैशिष्ट्ये आणि विशेष आकर्षणे:
पूर्णपणे मोफत (FREE) प्रवेश: एकता महिला मंचच्या सर्व सन्माननीय सदस्यांसाठी घरापासून ते थेट पर्यटन स्थळापर्यंत जाण्या-येण्याची उत्तम सोय आणि स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था अगदी मोफत करण्यात आली आहे.
नवनवीन आकर्षणे: निसर्गरम्य वातावरणासह महिलांच्या स्वागतासाठी खास स्विमिंग पूल आणि इतर अनेक नवनवीन आकर्षणे येथे सज्ज आहेत.
मनोरंजन आणि स्पर्धा: या ट्रिपमध्ये दिग्गज मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच फेर धरणे, फुगडी खेळणे, झोका खेळणे, एकपात्री नाटक किंवा विविध कला सादरीकरणाची संधी महिलांना मिळणार असून, मनोरंजनात्मक स्पर्धा व भरघोस बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.
खास फोटो व व्हिडिओ शूट: महिलांच्या आयुष्यातील हे सोनेरी क्षण कायमचे आठवणीत राहण्यासाठी भव्य फोटो आणि व्हिडिओ शूटची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
एकता महिला मंचचे आवाहन:
“हा दिवस फक्त आणि फक्त महिलांचा असून, त्यांनी स्वतःसाठी हा आनंद लुटायचा आहे. सोलापूर जिल्ह्यातील ‘एकता महिला मंच’च्या सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय सदस्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि हा दिवस आनंदी वातावरणात साजरा करावा,” असे आवाहन एकता महिला मंचचे प्रमुख श्री. प्रभाकर क्षीरसागर यांनी केले आहे.
चला तर मग… भेटूया २ ऑगस्टला, सकाळी ९ वाजता ‘प्रशांजली ॲग्रो टुरिझम’ नांदणी रोड, वैराग येथे!
Post Views: 10