सोलापूर – येथील दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळ संचलित ‘सप्तपदी’तर्फे सकल दिगंबर जैन वधू-वर पालक परिचय मेळावा रविवारी ( दि.२६ जुलै) उत्साहात पार पडला.
विजापूर रोडवरील सुंदर मल्टिपर्पज हॉल येथे याचे उद्घाटन छत्रपती संभाजीनगर येथील रवी मसाले परिवाराचे फुलचंद जैन, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, नमोकार तीर्थचे ट्रस्टी प्रितम शहा, दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळाचे अध्यक्ष अनिल जमगे, डॉ. अजित माणिकशेटे, सुधीर पंडित, महिला मंडळाचे अध्यक्ष मनीषा जमगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यानंतर वधू-वर सूची पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. गौरव अध्यक्ष डॉ. महावीर शास्त्री यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुवर्णा कटारे व चेतन तुपकर यांनी केले. मंडळाचे सचिव देशभूषण व्हसाळे यांनी आभार मानले.
——
*दिसण्यापेक्षा असायला कसा हे खूप महत्वाचे*
आपला लाईफ पार्टनर हा दिसण्यापेक्षा असायला कसा हे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी वधू-वर मेळाव्याची गरज आहे. यातूनच योग्य लाईफ पार्टनर मिळणार आहे.
– प्रीतम शहा, नमोकार तीर्थचे ट्रस्टी
——–
*समाजाला जोडण्याचे काम*
जैन समाज विखूरला आला. दिगंबर जैन पंचम समाज विकास मंडळ हे पसंतीचे वधू-वर मिळावेत यासाठी प्रयत्न करुन समाज जोडण्याचे काम करीत आहेत.
-फुलचंद जैन, रवी मसाले परिवार, छत्रपती संभाजीनगर
————-
वधूना नोंदणी शुल्क परत केले
या मेळाव्यात कर्नाटकसह महाराष्ट्रातील ३५० वधू-वराची नोंदणी झाली होती. ज्या वधूनी स्टेजवर येऊन परिचय दिला. त्यांचे नोंदणी शुल्क संयोजकांनी परत दिले.



















