सोलापूर – सोलापूर जिल्हा जीत कुने डो मार्शल आर्ट स्पोर्ट्स स्पर्धा २०२६ मध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व प्रमाणपत्र वितरण सोहळा ग्रँडमास्टर युवराज गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.
अनुपम पार्क, सैफुल येथे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान अभिजीत गायकवाड यांनी भूषवले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वसुंधरा कला महाविद्यालयाचे प्रा. डॉ. मारुती घंटेवाड, प्रा. डॉ. बापू राऊत, चंद्रकांत कमळे, कुमार नारायणे, शस्त्रांग मार्शल आर्ट असोसिएशनचे सचिव सम्राट गायकवाड, टेक्निकल डायरेक्टर किशोर चंदनशिवे, कार्याध्यक्ष सुनील बरगोडिया, संदीप गायकवाड, नागेश कांबळे, लेडीज कोच वैभवी दळवी, किमया सपाटे आदी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांसमोर शिस्त, आत्मविश्वास, नियमित सराव आणि शिक्षणासोबत खेळाचे महत्त्व यावर विचार मांडले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. ग्रँडमास्टर युवराज गायकवाड आणि टेक्निकल डायरेक्टर आनंद जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



















