बार्शी – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल मागील पंधरवड्यात जाहीर झाला सुयश विद्यालय बार्शी येथील इयत्ता आठवीचे १४४ विद्यार्थी व इयत्ता पाचवीचे ११६ विद्यार्थी असे एकूण २६० विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व इयत्ता सातवी परीक्षेचा निकाल २५ जुलै रोजी जाहीर झाला. या परीक्षेतही सुयश विद्यालयानेच महाराष्ट्रात बाजी मारल्याचे निकालावरुन सिद्ध होते.
या परीक्षेत इयत्ता चौथीचे २०३ विद्यार्थी तर इयत्ता सातवीचे १२२ विद्यार्थी असे एकूण ३२५ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्याप्रमाणेच इयत्ता चौथी व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनीही नेत्रदीपक यश मिळवून सुयश विद्यालय शैक्षणिक गुणवत्तेत महाराष्ट्रात अग्रेसर आहे हे सिद्ध केले आहे.
इयत्ता चौथीचे २६० पेक्षा जास्त गुण प्राप्त विद्यार्थी- आवटे विराज- 280, पायगन रविराज – 274, आवाड अर्णव – 270, देशमुख रिद्धेश- 266, माहुले ओवी- 264, डुमणे सक्षम- 264, बाशिंगे आर्या- 262, देव स्वरूपा- 260, मोहिते वीरेंद्रसिंह- 260, जाले सत्यजित- 260.
इयत्ता सातवीचे 260 पेक्षा जास्त गुणप्राप्त विद्यार्थी- काळे अनय- 284, देवकर गिरीश- 268, आत्तार अबूसुफियान- 264, पिंगळे साईराज- 264, साखरे सोहम- 262, स्वामी सोहम- 262, भास्कर आदर्श- 262, सालसकर अनिश- 262, बांगर अथर्व- 260, आगलावे ईश्वरी- 260, शिरगिरे सार्थक- 260ऋ
इयत्ता चौथीचे- इंग्रजी- 50 पैकी 50 गुण प्राप्त 40 विद्यार्थी. गणित- 100 पैकी 100 गुण प्राप्त चार विद्यार्थी
या विद्यार्थ्यांना श्रीमती.अमृता खडसरे (इंग्रजी), श्रीमती ज्योती भोसले (गणित), श्री.संदीप मुंढे (मराठी), श्रीमती आशा जटाळे (बुद्धिमत्ता) या शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. तसेच इयत्ता सातवी परीक्षेतही
इंग्रजी:- विषयात 50 पैकी 50 गुण प्राप्त 11 विद्यार्थी
गणित:- 100 पैकी 100 गुण प्राप्त चार विद्यार्थी व
मराठी:- 50 पैकी 50 गुण प्राप्त दोन विद्यार्थी आहेत.
या विद्यार्थ्यांना श्रीमती अर्चना शेटे (इंग्रजी )श्रीमती विजयालक्ष्मी सुरवसे (गणित )श्रीमती अर्चना माने (मराठी) व श्रीमती सोनाली बोंगाळे (बुद्धिमत्ता) यांनी मार्गदर्शन केले.या उत्तुंग यशाबद्दल बार्शीचे आमदार माननीय राजाभाऊ राऊत, संस्थेचे अध्यक्ष शिवदास नलवडे, मार्गदर्शिका प्रतिभा नलवडे, श्री प्रसाद नलवडे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले