सोलापूर – चक्रवर्ती गणपती देवस्थान ट्रस्टतर्फे महाराष्ट्र शासनाच्या एसटी महामंडळातर्फे देण्यात येणाऱ्या एनसीएमसी स्मार्ट कार्डच्या शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबिर शनिवार दि. एक ऑगस्ट रोजी श्री चक्रवर्ती महागणपती देवस्थान मंडप. 95/3B चक्रवर्ती हाउसिंग सोसायटी, दयानंद कॉलेज शेजारी रविवार पेठ सोलापूर येथे सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत होईल. यासाठी व्यक्ती स्वतः हजर राहणे आवश्यक. आधार कार्ड व मोबाईल आणि मोबाईल आधार कार्ड लिंक केलेला आवश्यक. वय वर्ष बारा पूर्ण केलेल्या सर्व महिलांसाठी आणि
वय वर्ष 65 पूर्ण केलेल्या महिला व पुरुषांसाठी आहे. तरी या भागातील अथवा शहराच्या कोणत्याही भागातील इच्छुकांनी संतोष सोनीमिंडे (94224 62804 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चक्रवर्ती महागणपती देवस्थान ट्रस्टचे सेक्रेटरी रमेश जैन यांनी केले आहे.
Post Views: 13