सोलापूर – सन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचालित श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून प्रशालाचे मुख्याध्यापक श्री रमेश यादवाड सर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.शेटे पी.पी उपस्थित होते. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांकडून प्रमुख मान्यवर व सर्व शिक्षकांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. कु.जान्हवी पवार, सृष्टी कोळी, अशिनी कुंभार, प्रेरणा विटकर, जोया इनामदार, गौरी हडपाद, वैष्णवी मनसावले या विद्यार्थिनींनी पेटी वर सुमधुर स्वागतगीत गायन केले.मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती मातेचे पूजन करण्यात आले. उपस्थित मान्यवर,सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे पेन बुके देऊन गुरुपौर्णिमा निमित्त सत्कार करण्यात आला. गुरु पौर्णिमेचे महत्त्व ब्रह्मेश कोल्प्याक, सैफ नदाफ, गायत्री कुंभार,विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. प्रशालेतील शिक्षक श्री.बसवंत पाटील गुरुविषयी माहिती सांगितले, प्रमुख पाहुणे श्री.शेटे पी.पी.यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री रमेश यादवाड यांनी जीवनात गुरुचे महत्त्व मनोगतातून सांगितले. गुरुपौर्णिमा कार्यक्रम इयत्ता नववी अ व ब मधील विद्यार्थांनी नियोजन केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुं. कोळी,मेलकडे, हडपद, कुंभार,इनामदार, विटकर, बागवान यांनी केले.
Post Views: 10