माळशिरस – माळशिरस शहर व परिसरात आषाढ शुद्ध पौर्णिमेला शेतकऱ्यांचा महत्वाचा बैल पोळा (बेंदूर) सण साजरा साजरा करण्यात आला
ग्रामदैवत मारुती मंदिरात पाटील कुटुंबांच्या बैलांची पूजा करून गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढून या सणाची सुरवात झाली यावेळी शितल पाटील ,संदीप पाटील ,सुर्यकांत पाटील,संग्राम पाटील,विश्वजित पाटील,,अभिजित पाटील,अमित पाटील,स्वप्नील पाटील. यांच्यासह पाटील कुटुंबाने मंदिरात बैलांची पूजा केली
शेतीच्या मशागतीसाठी आता अत्याधुनिक उपकरणांचा वापर वाढला असल्याने बैलांची संख्या फारच कमी झाली आहे .पोळा सण हा शेतकऱ्यासाठी महत्वाचा मानला जातो .या दिवशी शेतकरी आपल्या जनावरांना धुऊन ,सजवून त्याची सवाद्य मिरवणूक काढण्याची परंपरा आहे परंतु आज शहरात सकाळ पासून दिसणाऱ्या मिरवणुका दिसून आल्या नाहीत .घरोघरी शेतकऱ्यांनी आपल्या बैला बरोबर गाई,म्हशी यासह जनावरांना सजवून त्यांची पूजा केली
या सणासाठी लागणाऱ्या जनावरांच्या सजावटीची अनेक दुकाने व्यापाऱ्यांनी थाटली होती .गेले दोन दिवस या दुकानात शेतकऱ्यांनी सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
Post Views: 11