सोलापूर :- शाळा समिती अध्यक्ष सुरेश बाबु मंकणी यांच्या प्रेरणेने व प्राचार्या स्मिता कांगुणे यांच्या मार्गदर्शनानुसार हरिभाई देवकरण क. महाविद्यालयात मुंशी प्रेमचंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी हिंदी विभाग प्रमुख प्रा. धन्यकुमार बिराजदार यांनी मुंशी प्रेमचंद यांच्या व्यक्तित्व आणि कृतीत्वावर प्रकाश टाकला. त्यांनी मुंशी प्रेमचंद यांचे साहित्य आज सुद्धा प्रासंगिक असून त्यांच्या साहित्याचे पुनर्मूल्यांकन करणे आवश्यक आहे असे सांगून त्यांच्या साहित्यामध्ये निहित भारतीय ज्ञान परंपरेवर प्रकाश टाकला.
यावेळी पर्यवेक्षक बी. डी. बनसोडे व जिजाबाई कोकरे यांनी मुंशी प्रेमचंद यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या साहित्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे नमूद केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये उपप्राचार्य शांतप्पा कुंभार यांनी मुंशी प्रेमचंद थोर हिंदी साहित्यिक असून त्यांनी समाजाच्या उत्थानासाठी लेखणी चालवली असून गरीबांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कीर्तना अरीकेरी यांनी केले. या कार्यक्रमासाठी ए. सी. राऊत, प्रा. कदम पी. पी. , प्रा. दिपक क्षीरसागर, प्रा. एस. के. कुलकर्णी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Post Views: 9