पिलीव – माळशिरस तालुक्यातील फेब्रुवारी महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचे कामकाज न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहे.कारण सरपंचांची मुदत संपल्यानंतर गावगाडयातील कामकाज सुरळीपणे होण्यासाठी शासनामार्फत सदरच्या ग्रामपंचायतीवर शासनामार्फत प्रशासक नेमते. पहिल्यांदा शासनाने फेब्रुवारी महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीसाठी विद्यमान सरपंचाना मुदतवाढ देण्याचे निर्णय जाहीर केला .माञ या निर्णयाविरुद्ध न्यायालयात याचीका दाखल झाल्यानंतर सरपंचाना मुदतवाढ देण्याचा निर्णय रद्द झाला असुन ही संपूर्ण प्रक्रियाच न्यायालयीन कचाट्यात अडकली असुन सदरच्या ग्रामपंचायतीवर शासनामार्फत अद्यापपर्यंत प्रशासनाची नियुक्ती झालीच नाही .यामुळे गावगाडयातील कामकाज ठप्प झाले आहे.कारण सरपंचाऐवजी प्रशासकाला सहीचा अधिकार दिला जातो. यामुळे गावगाडयातील आर्थिक अधिकार ग्रामविकास अधिकारी व प्रशासक यांच्या सहीने ग्रामपंचायतीचे सर्व आर्थिक अधिकार चालतात माञ तालुक्यातील जवळपास मुदत संपलेल्या 36 ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती न झाल्यामुळे गावगाडयातील विकास कामे व झालेल्या कामांची बिले प्रलंबित राहीली आहेत.शासन यावर निर्णय घेत नाही .आता प्रशासक नेमणार की गावगाडयातील निवडणुकांचे बिगुल वाजतात. तश्या हालचाली सध्या प्रशासना मार्फत सुरु आहेत. माञ शासनाने जर का दोन _ तिन महीन्यात निवडणुका घेतल्या तर गावगाडयातील कामे ठप्प होतील. तसेच झालेल्या विकास कामांची बिले अडकून पडणार यामुळे गावगाडयातील पुढाऱ्यांचे या शासन निर्णयाकडे लक्ष लागले आहे. चौकट _ शासनाने प्रशासकाची नियुक्ती न केल्यामुळे अनेक कामाची बिले प्रलंबित असुन गावगाडयातील विकास कामे थांबली आहेत.शासनाने ताबडतोब याबाबत निर्णय घ्यावा _ शहाजी लेंगरे ,माजी सरपंच ग्रामपंचायत कुसमोड. चौकट _ याबाबत माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पांढरे यांच्याकडुन याविषयी माहीती जाणुन घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी मोबाईल च उचलला नाही.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















