सांगोला – इ.स.२००५ ची स्थापना असलेल्या सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथे बी.फार्मसी अभ्यासक्रमाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी स्क्रुटिनी सेंटर म्हणून महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनिता दिलीपकुमार इंगवले यांनी दिली. महाविद्यालयामध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता बारावी शास्त्र उत्तीर्ण विद्यार्थ्यां करिता बी.फार्मसी प्रवेश बाबत मोफत मार्गदर्शन केंद्र व ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये प्रवेशप्रक्रियेसाठी लागणारे गुणपत्रके, प्रमाणपत्रे व इतर कागदपत्रे व संपूर्ण प्रवेशप्रक्रिया या बदल सखोल माहिती विद्यार्थी व पालकांना देण्यात येणार आहे असे संस्था विश्वस्त विश्वजीत दिलीपकुमार इंगवले यांनी सांगितले. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत पालक व विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या विविध शंका व अडचणी याबाबत मोफत सखोल मार्गदर्शन महाविद्यालयातील अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांमार्फत उपलब्ध होणार आहे. तरी विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी डॉ.एन.ए.तांबोळी (९४२२६४४८७६), डॉ.औदुंबर माळी (९९७५९२८३५०), प्रकाश पाटील (९८८१४३३६५८) पी.एस.लोखंडे (९८२३१०७३७१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ.मनोजकुमार पाटील यांनी केले आहे.
चौकट-
या सुविधा केंद्रामध्ये बारावी शास्त्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे बी.फार्मसी प्रवेशकरिता ऑनलाईन अर्ज दि.३१ जुलै ते १० ऑगस्ट दरम्यान स्वीकारले जाणार आहेत. अंतिम मेरिट लिस्ट दि.१९ ऑगस्ट रोजी आहे. सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी या सुविधा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन व मूळ कागदपत्रे पडताळणी, अर्ज निश्चिती होणार आहे.