सोलापूर – मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूरच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास माजी महापौर आरिफ शेख आणि शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे, बशीर सय्यद, कादर भागानगरी, तन्वीर शेख, रुस्तुम शेख, हुजेर बागवान, शेरु उस्ताद, मोहसीन शेख, हारिस शेख, काशीब बेलीफ, शब्बीर फुलमामडी, फईम बॉम्बे, रिजवान शेख, तन्वीर शेख, रुस्तुम शेख, सरफराज काझी, आरिफ वागदूरीकर, मोहसीन नदाफ, इरफान बावा आदी उपस्थित होते.























