महाळुंग ता . माळशिरस येथिल आणाभाऊ साठे तरुण मंडळाचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या जयंती उत्सवात बोलत होते .
याप्रसंगी मंचावर स .म . साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र सावंत पाटील, महाळुंग – श्रीपूर नगरपंचायतीचे गटनेते राहूल रेडे – पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल सज्जन जाधव, नगरसेवक सोमनाथ मुंडफणे , तानाजी भगत , आरपीआय चे शामराव भोसले, संदीप घाडगे , शिवसेनेचे ( उबाठा ) नितीन वाघमारे , आण्णाभाऊ साठे मंडळाचे अध्यक्ष पै . अशोक चव्हाण , अक्षय चव्हाण, नवनाथ चव्हाण, शिवम साठे, दतात्रय चव्हाण , बाळासाहेब वाघमारे, मसू चव्हाण , संजय चव्हाण, आबा चव्हाण , रघुनाथ चव्हाण, पत्रकार अरविंद साठे , पप्पू चव्हाण, विशाल चव्हाण , दादा उत्तम चव्हाण , शंकर माने उपस्थित होते . सुत्रसंचालन बाळासाहेब वाघमारे यांनी केले .
*७५ जणांचे रक्तदान*
जयंती उत्सव मंडळाचे वतीने सामाजीक उपक्रम राबविताना रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत ७५ जणांनी रक्तदान केले . या बरोबरच पर्यावरणाला पुरक असलेली वड, पिंपळ, चिंच या वृक्षाचे रोपण करण्यात आले .



















