Monday, September 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संत नामदेव महाराज समाधी सोहळा 11 ऑगस्ट रोजी ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज नामदास; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

तरुण भारतbyतरुण भारत
August 2, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
38
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – भागवत धर्माची पताका संपूर्ण देशभर फडकविणारे श्री विठ्ठलाचे लडीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज व परिवार तसेच संत जनाबाई महाराज यांच्या ६७६ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आषाढ वद्य १ गुरुवार दि. ३०जुलै ते श्रावण शु. १० शनिवार दि. २२ऑगस्टपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी दिली.
यावर्षी संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७६ वा संजीवन समाधी सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र पंढरपुरातील संत नामदेव मंदिर (जन्मस्थान) येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अखंड हरिनाम सप्ताहात पहाटे 5 वाजता काकड आरती, भजन, सकाळी ७ ते १० वाजता संत नामदेव महाराज गाथा भजन, सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत किर्तन, दुपारी ३.३० ते ५ वाजेपर्यंत प्रवचन व नंतर हरिपाठ, सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत किर्तन व रात्री जागर असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. मुख्य धार्मिक कार्यक्रमाच्या अंतर्गत आषाढ व. ११, रविवार दि. ९ ऑगस्ट रोजी दिंडीची नगर प्रदक्षिणा, सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी क्षिरापत, आषाढ व. १३ मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संत नामदेव महाराज, संत जनाबाई महाराज व परिवार तसेच संत सावता माळी यांच्या संजीवन समाधी सोहळ्यावर आधारित ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे किर्तन होणार आहे. दुपारी १ वाजता पुष्पवृष्टी व आरती झाल्यानंतर श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री केशवराज, संत नामदेव महाराज, जनाबाई यांना नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर यांच्यावतीने भाविक, नागरिकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.
आषाढ व. ३० बुधवार दि. १२ ऑगस्ट रोजी ह.भ.प. नामदास महाराज यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता पालखी लवाजम्यासह दिंडीची नगर प्रदक्षिणा होणार आहे. सदरचा अखंड हरिनाम सप्ताह व धार्मिक सोहळा संत नामदेव महाराजांचे वंशज सर्वश्री ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज,  माधव महाराज, मुकुंद महाराज, केशव महाराज, कृष्णदास महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असून यासाठी सर्वश्री ह.भ.प. एकनाथ महाराज, निवृत्ती महाराज, मुरारी महाराज, विठ्ठल महाराज, हरि महाराज, केदार महाराज, भावार्थ महाराज, आदित्य महाराज यांच्यासह संत नामदेव महाराज वंशज, नामदास महाराज परिवार, संत नामदेव महाराज फड, संत नामदेव-जनाबाई महाराज सेवा प्रतिष्ठान, संत नामदेव शिंपी समाज पंढरपूर हे परिश्रम घेत आहे. वरील सर्व धार्मिक कार्यक्रमास संत नामदेव महाराज भक्त परिवार व समस्त शिंपी समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन नामदास महाराजांनी केले आहे.
———-
चौकट :
(११ ऑगस्ट रोजी उत्सवाचा मुख्य दिवस)
यावर्षी रविवार दि. ९ रोजी एकादशी असून दिनदर्शिकेमध्ये (कॅलेंडर) सोमवार दि.१० रोजी संत नामदेव महाराज समाधी सोहळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र वारकरी, फडकरी प्रथेनंतर एकादशीनंतर द्वादशी दिवशी क्षीरापतीचा कार्यक्रम झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे आषाढ व. १३ मंगळवार दि. ११ ऑगस्ट रोजी संत नामदेव महाराजांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात येणार असल्याची माहिती ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांनी दिली.
Post Views: 110
Previous Post

लायन्स क्लब पंढरपूर अध्यक्षपदी सी ए अतुल कौलवार

Next Post

चिंचणीला राज्य शासनाचा ५ लाखाचा आदिशक्ती पुरस्कार जाहीर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
चिंचणीला राज्य शासनाचा ५ लाखाचा आदिशक्ती पुरस्कार जाहीर

चिंचणीला राज्य शासनाचा ५ लाखाचा आदिशक्ती पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्या

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

मंद्रूप परिसरात परतीच्या पावसामुळे अंशतः दिलासा

September 21, 2026
श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1243624

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!