पंढरपूर – महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभाग यांच्यावतीने महिलांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक समस्या जाणून घेऊन त्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या द्रष्टीने राज्यात आदिशक्ती अभियान चिंचणी ग्रामपंचायतीने उत्कृष्टपणे राबवित जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा आदिशक्ती पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ लाख रुपये व सन्मानचिन्ह असे स्वरूप असणार आहे. या पुरस्कारामूळे चिंचणीच्या कार्याचा आलेख वाढत चालला असल्याचे मोहन अनपट यांनी सांगीतले.
या अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. परंतु चिंचणी ग्रामपंचायतीने गुणवत्तापुर्ण आदिशक्ती अभियान राबवून गावातील बालविवाह प्रतिबंधक विषय उपाय योजना, हुंडा प्रथेस प्रतिबंध, गाव कौटुंबिक हिंसाचार मुक्त करणे, महिलांना कौशल्य विकास अंतर्गत प्रशिक्षण, स्वयंरोजगार मध्ये कार्यरत महिलांचा सहभाग वाढवणे, महिला बचतगट निर्मिती व सक्षमीकरण, आरोग्य तपासणी, संस्थात्मक प्रस्तुती वाढवणे, महिला स्नेही वातावरण निर्माण करणे. तसेच वैशिष्टय़पूर्ण अंतर्गत पर्यटनाच्या माध्यमातून गावातच रोजगार निर्माण केला आहे. सार्वजनिक स्वच्छता, वृक्षलागवड, साक्षरता, व्यसनाधीनता, लोकसहभाग याबाबींवर आधारित हे अभियान चिंचणी ग्रामपंचायतीने सक्षमपणे राबवले. यामुळे आदिशक्ती पुरस्कार व सोलापूर जिल्ह्यात प्रथम क्रमांक आल्याचे राज्य शासनाकडून शासन निर्णयाने जाहीर करण्यात आले आहे. सदर पुरस्काराचे स्वरूप 5 लाख रुपये व सन्मानचिन्ह असे आहे.
हे आदिशक्ती अभियान राबवण्यासाठी चिंचणी ग्रामपंचायतचे प्रशासक अरूण भुजबळ, ग्रामपंचायत अधिकारी चंद्रशेखर गिड्डे, पोलिस पाटील शरद कौलगे, ग्रामस्तरीय समितीच्या अध्यक्षा वैशाली सावंत, अनिता वेदपाठक, अमृता कांबळे, राणी नवले, मंगल पवार, रुतुजा जाधव, दिक्षा अनपट, मिरा सावंत, कस्तुरा जाधव, निता सावंत, राधिका अनपट, सविता सावंत, मनिषा जाधव, यास्मिन शेख, लता अनपट, मयुरी कापसे, चंद्रकांत पवार, मोहन अनपट, शशिकांत सावंत, शरद सावंत, शिवाजी अनपट, ज्ञानेश्वर सावंत, दत्तात्रय अनपट यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आहे.
Post Views: 4