बार्शी – ब्राह्मण महासंघ शाखा बार्शीच्यावतीने नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राजेंद्र राऊत यांची आमदार म्हणून नुकतीच निवड झाली. त्याबद्दल ब्राह्मण महासंघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी त्यांच्या हस्ते बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंत, समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम व क्रांतीचे प्रणेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
आमदार राजेंद्र राऊत म्हणाले की, बार्शी तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय असून त्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, नगराध्यक्षा सौ.तेजस्विनी कथले, सभापती सौ मिनाक्षी रोंगे, माजी खासदार शिवाजी कांबळे, प्रशांत कथले यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रवीण शिरसीकर, दिनकर सापनाईकर यांनी तर पेशवा युवा मंचच्यावतीने सूर्यकांत देशमुख, सुशील बडवे व मनोज बडवे यांनी सत्कार केला.
प्रास्ताविक अमोल कुलकर्णी यांनी केले. भाऊंनी परशुराम भवनासाठी ३० ते ३५ लाखांचा निधी, लोकमान्य टिळक पुतळ्यासाठी शिडीची व्यवस्था केल्याचे सांगितले.
याप्रसंगी डॉ हेमंत साने, माजी खासदार शिवाजी कांबळे, रमाकांत कुलकर्णी यांनी विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल काळे यांनी तर आभार प्रदर्शन किरण देशमुख यांनी केले.