पिलीव – माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील उमेश धर्मा कांबळे यांची कन्या आदीती हिचा साखरपुडयाचा कार्यक्रम हा एक ऑगस्ट रोजी तिचा वाढदिवस होता.तिचा साखरपुडा पिलीव येथील मयुर ध्वज विष्णु सरवदे यांचा मुलगा विशाल याच्या बरोबर ठरल्या प्रमाणे होता . सरवदे हे पिलीव येथील उद्योग व्यवसायातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असणारे कुटुंब ठेकेदार उमेशभाऊ सरवदे ,त्यांचे दोन्ही बंधुही व्यवसायिक त्यामुळे मोठ्या धामधुमीत लग्न करायला काहीच अडचण तर नव्हतीच पण उदयोजक उमेशभाऊ सरवदे यांनी मुलीच्या कुटुंबीयांना आपण या साखरपुडयातच विवाह करुया त अशी विनंती केली असता मुलीकडील आई _ वडील नातलग राजी झाले मग काय एका तासातच सर्व विवाहाची तयारी आणी साखरपुडयातच उरकले लग्न. यामुळे सरवदे व कांबळे कुटुंबीयांना समाजात आदर्श घालुन लग्नावर बेमाप होणार खर्च उधळण थांबून लागलीच साखरपुडयातच विवाह उरकला याची चर्चा पिलीव व वेळापूर परीसरात तसेच समाजात कुतुहलाच विषय ठरला आहे .या विवाह सोहळ्यासाठी पिलीव जिल्ह्य परिषद गटाचे सदस्य चंद्रकांत जाधव, बोरगाव जिल्ह्य परिषद गटाचे नागेश भोसले, वेळापूर जिल्ह्य परिषद गटाचे मिलींद सरतापे, माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती अमोल मदने पाटील, पिलीव पंचायत समिती गणाचे सदस्य शिवराज पुकळे, माजी जिल्ह्य परिषद सदस्य बाळासाहेब धाईंजे, माजी जिल्ह्य परिषद सदस्य गणेश पाटील, माजी जिल्ह्य परिषद सदस्य सतीश माने देशमुख, आरपीआय नेते नंदकुमार केंगार, अकलुजचे नगरसेवीका मनीषा तिकुटे, नगरसेवक नाशीक सोनवणे, आरिफखान पठाण, माळशिरस तालुका भाजपा मंडल अध्यक्ष नितीन मोहीते, किरणबाबा गायकवाड, किरण धाईंजे, भैय्यासाहेब मोरे, रणधिर काटे, अँड सत्यजित गलाडे, कुमार भैस, राजेंद्र जामदार, कल्याण जावळे, विजय बनसोडे, रणजित सरवदे, प्रफुल्ल उर्फ भैय्यासाहेब बाबर, चंद्रकांत सरवदे, संजय पाटील,गणेश देशमुख, संतोष पडळकर, यांच्यासह सरवदे व कांबळे यांचा मिञ परिवार या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होता. फोटो _ सरवदे व कांबळे साखरपुडयातील विवाह सोहळा.























