सोलापूर – निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलास क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे विभागाचे क्रीडा उपसंचालक युवराज नाईक यांनी सदिच्छा भेट देऊन प्रशालेच्या शैक्षणिक व क्रीडा विषयक कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
प्राचार्य रविशंकर कुंभार यांनी क्रीडा उपसंचालक नाईक यांचे स्वागतपर सत्कार केले. यावेळी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा महासंघाचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव,शहर अध्यक्ष विठ्ठल कुंभार,प्रमोद चुंगे, सचिन गाडेकर, उज्ज्वल मलजी पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी प्रशालेचे क्रीडा शिक्षक विठ्ठल कुंभार यांनी शिक्षण संकुलात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, क्रीडा सुविधा याविषयी माहिती सांगितले. प्रशालेच्यावतीने मैदानावर अन्य विविध खेळांच्या क्रीडांगणे विकसित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्तावास त्यांनी मंजुरी देत संबंधित कामाचे उदघाटन केले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना व खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. सूत्रसंचालन विश्वाराध्य मठपती यांनी केले.
Post Views: 35