सोलापूर : शहरात मोकाट श्वानांची संख्या वाढल्याने श्वानदंशाच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. प्रभाग क्रमांक ३ मध्ये श्वानदंशानंतर एका मुलाचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक राजकुमार पाटील यांनी केली आहे.
श्वानदंश झालेल्या रुग्णांना सध्या अँटी-रेबीज सीरम (ARS) व अँटी-रेबीज व्हॅक्सिन (ARV) घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय तसेच डफरीन चौकातील मनपाच्या मदर तेरेसा पॉलीक्लिनिकमध्ये जावे लागते. त्यामुळे रुग्णांची होणारी धावपळ टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयासमोरील मनपाच्या आयडीएच दवाखान्यात डॉक्टर व प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करून लसीकरणाची सुविधा तातडीने सुरू करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
Post Views: 27