जालना : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जालना दौऱ्यावर आले असता नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर यांनी भेट घेऊन जालना
शहरातील नवीन जालना भागात असलेल्या एसआरपीएफच्या आरक्षित जागेवर भव्य उद्यान, नाट्यगृह व क्रीडांगण यांची उभारणी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. तसेच स्थानीक आमदार अर्जुनराव खोतकर यांनाही निवेदन देऊन सदरील विकास कामांसाठी निधी मिळवून द्यावा अशी विनंती केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन देतांना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब
घुगे, युवा नेते अभिमन्यू खोतकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, पालिकेतील
विरोधी पक्षनेते कमलेश खरे, नगरसेवक दुर्गेश काठोठीवाले, संजय डुकरे,
अमोल ठाकूर आदींची यावेळी उपस्थिती होती.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आमदार अर्जुनराव खोतकर
यांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक अश्विन अंबेकर यांनी म्हटले आहे की,
जालना शहराची लोकसंख्या पाच लाखांहून अधिक झाली आहे. नगरपालिकेतून
महानगरपालिकेत रुपांतर झालेल्या या शहरात एकच उद्यान आहे.
भौगोलिकदृष्ट्या जालना शहर हे अर्धे नवीन जालना व अर्धे जुना जालना असे
दोन भागात विभागलेले आहे. नवीन जालना भागात अडीच लाखांपेक्षा अधिक
लोकसंख्या आहे व मोठे खेळाचे मैदान नाही. महानगरपालिकेने विकास आराखड्यात
नवीन जालन्यात SRPF च्या दीडशे एकरहून अधिक असलेल्या जागेपैकी २० एकर
जागेवर उद्यान व खेळाचे मैदान प्रस्तावित केलेले आहे. शहरालगत असलेल्या
मंठा चौफुली या भागातील जागेत संबंधित आरक्षण विकसित करून तेथे एक मोठे
उद्यान, जलतरण तलाव, १२०० आसन क्षमतेचे भव्य नाट्यगृह-सभागृह व मोठे
खेळाचे मैदान इ. सुविधा उभारण्यासाठी महानगरपालिकेला २५ कोटींचे विशेष
अनुदान देण्यात यावे.
सदरील महानगरपालिकेने उद्यान व इतर सुविधा विकसित केल्यावर
देखभाल-दुरुस्तीसाठी SRPF कडेच हस्तांतर करून शहरातील नागरिकांसाठी ते
खुले ठेवावे. जेणेकरून जालना शहराच्या वैभवात भर पडेल व नागरिकांना या
सर्व सुविधांचा लाभ घेता येईल. देखभाल दुरुस्ती SRPF कडे राहत असल्यामुळे
व नाममात्र दरात नागरिकांना प्रवेशिका लावल्यास निश्चित स्वरूपाचे
उत्पन्नही मिळेल. करिता जालना शहराच्या विकासासाठी व नागरिकांच्या
सुविधेसाठी आपण २५ कोटी रुपयांचा निधी विशेष बाब म्हणून महानगरपालिकेला
द्यावा अशी मागणी नगरसेवक अश्विन अंबेकर यांनी केली. यापूर्वीही त्यांनी
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याबाबत जोरदार मागणी केली असून मा.आयुक्त
यांना भेटूनही याबाबत विनंती केली आहे.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...






















