सांगोला – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इ.४ व ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यामंदिर परिवाराचे ८३ विद्यार्थी राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. यामध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेचा अर्णव चतुरगुण औताडे याने सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत २८६ गुणांसह राज्यात ५ वा व जिल्ह्यात प्रथम तसेच सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाची अश्विनी अशोक लांडगे हिने चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये २७२ गुण मिळवत राज्यात १३ वा क्रमांक प्राप्त केला. या यशाबद्दल शिष्यवृत्तीधारक सर्व विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे आणि पालकांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ऍड.विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, सदस्य विश्वेश झपके यांच्यासह परिवारातील सर्व मुख्याध्यापक व प्रशासकीय वर्ग, बाह्यपरीक्षा विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
विद्यामंदिर परिवार गुणवत्तेत ‘अजिंक्य’
इयत्ता चौथी सांगोला तालुका एकूण शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ३३ त्यापैकी २७ विद्यार्थी सांगोला विद्यामंदिर प्राथमिक विद्यालयाचे, इयत्ता सातवी सांगोला तालुका एकूण शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ७८ त्यापैकी ५६ विद्यार्थी विद्यामंदिर परिवाराचे (सांगोला ४८, नाझरा ४, कोळा ३, सांगोला इंग्लिश मीडियम स्कूल सांगोला १) सांगोला शहर एकूण शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी ५२ त्यापैकी ४८ विद्यार्थी सांगोला विद्यामंदिरचे
Post Views: 15