मोडनिंब – विधानमंडळाच्या अंदाज पत्रकीय समितीने माढा तालुक्यातील मोडनिंब (ता.माढा) येथील मागील चार वर्षांपासून रखडलेल्या जलजीवन मिशनच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या दिरंगाईबाबत माहिती घेतली.विधानमंडळ अंदाज समितीचे सदस्य आमदार सदाभाऊ खोत व आमदार किशोर पाटील यांनी या पाहणी दौऱ्यात विविध कामांचा आढावा घेतला. मोडनिंब येथे जलजीवन मिशन अंतर्गत चाललेल्या कामांची पाहणी केली. यावेळी रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुहास पाटील, उपविभागीय अधिकारी जयश्री आव्हाड, तहसीलदार संजय भोसले, गटविकास अधिकारी महेश सुळे, गटशिक्षणाधिकारी विकास यादव, उमेदचे अवधूत देशमुख, माजी सरपंच कैलास तोडकरी, उपसरपंच अमित कोळी, संजीव शिंदे, शिवाजी सुर्वे, अनिल शिंदे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली. मागील चार वर्षांपासून हे काम रखडले असून, त्यासाठी आणण्यात आलेल्या पाइपचा मोठा साठा अद्याप तसाच पडून असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. कोट्यवधी रुपयांच्या या प्रकल्पाला होत असलेल्या विलंबाबाबत समिती सदस्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...




















