पंढरपूर – श्रावणी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक, मनोहारी व पारंपरिक सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात आले. या पारंपरिक अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिक विलोभनीय दिसून आले.
श्री विठ्ठलास सोन्याचे मुकुट, कौस्तुभ मणी, दंडपेठया जोड मोठा, हिऱ्याचे कंगन जोड, बालाजी नाम, मोत्याच्या तुरा, मोत्याची कंठी दोन पदरी, मोठ्याची कंटी एक पदरी, शिरपेच लहान दहा लोक असलेला, शिरपेच मोठा दहा लोक असलेला , मत्स्य जोड, तोडे जोड, पुतळ्यांची माळ, जाणवे, तुळशीची माळ एक पदरी आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
तसेच, रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, ताणवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जवेच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी व कंबरपट्टा आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. याबाबतची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.
Post Views: 31