कचरा डेपो बाबत अकलूज नगर परिषदेचा निर्णय अगोदरच ; फुकटचे श्रेय घेण्यासाठी विरोधकांची स्टंटबाजी

अकलूज : ग्रामदैवत अकलाई देवीचा परिसर आणि नीरा नदीपात्राच्या स्वच्छतेबाबत अकलूज नगरपरिषदेने आधीच वैधानिक निर्णय घेऊन काम मार्गी लावलेले असताना, आयत्या पिठावर रेघोट्या मारत भाजप पदाधिकाऱ्यांनी सुरू केलेली घाणेरडी राजकीय स्टंटबाजी आता चव्हाट्यावर आली आहे. नगरपरिषदेने अधिकृत सभेत निर्णय झाला असताना भाजपचे पदाधिकारी अचानक जागे झाले आणि कॅमेऱ्यासमोर उभे राहून ‘अकलूज भकास झाले’ असा आव आणत जनतेची डोळ्यात धूळफेक करत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होताना दिसत आहे.
प्रत्यक्षात सत्ताधाऱ्यांनी हा प्रश्न अगोदरच गांभीर्याने हाताळून २५ ऑगस्ट २०२६ च्या सर्वसाधारण सभेत विषय क्र. ३ अन्वये कचरा डेपोसाठी खासगी जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा ठराव विषयपत्रिकेवर ठेवला होता. त्या दिवशी महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियम १९६५ च्या कलम ८१(९) नुसार आवश्यक गणपूर्तीअभावी नगराध्यक्षा सौ. रेश्मा अडगळे यांनी सभा तहकूब केली आणि ३१ ऑगस्टच्या तहकूब सभेत हा ठराव सर्वानुमते मंजूरही करून घेतला.
सत्ताधाऱ्यांनी घनकचऱ्याच्या समस्येवर कायदेशीर तोडगा काढून शहराच्या हिताचा निर्णय पदरात पाडून घेतल्यानंतर, भाजपच्या मंडळींना अचानक अकलाई देवीच्या परिसराचा पुळका आला आणि त्यांनी समाजमाध्यमांवर कचऱ्याचे व्हिडिओ व्हायरल करत नगरपरिषद काहीच करत नसल्याचे बकवास चित्र रंगवण्यास सुरुवात केली. हा जनतेच्या प्रश्नांचा पुळका नसून नगरपरिषदेच्या कामाचे फुकट श्रेय लाटण्यासाठी केलेली निव्वळ लाचार आणि उशिराची राजकीय नौटंकी आहे, अशी संतप्त चपराक स्थानिक नागरिकांनी लगावली आहे. सध्या शहरात भूमिगत गटार, पाणीपुरवठा आणि दर्जेदार सिमेंट रस्त्यांची कामे वेगाने सुरू असताना, त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून संपूर्ण शहराला बदनाम करण्याचा हा भाजपचा कुटील डाव उघडा पडला आहे.
केंद्रात आणि राज्यात भाजपचीच सत्ता आहे, जिल्ह्याला पालकमंत्रीही भाजपचाच लाभला आहे; मग या पदाधिकाऱ्यांनी गेल्या १२ ते १४ वर्षांत नेमके काय दिवे लावले? याचा हिशोब कागदपत्रांसह जनतेसमोर ठेवून दाखवावा, असे थेट आव्हान आता भाजपला देण्यात आले आहे.
 सत्ताधाऱ्यांनी निर्णय घेतल्यावर तोंडावर कॅमेरे धरून पोकळ भाषणे ठोकता, ही कसली लोकसेवा? अकलूजची जनता दूधखुळी नाही; कोण कागदावर अधिकृत निर्णय घेऊन प्रत्यक्षात घाम गाळतोय आणि कोण कामाचे श्रेय लाटायला उकिरड्यावर उभे राहून रील्स बनवतोय, हे जनतेला चांगले ठाऊक आहे. त्यामुळे असल्या छुप्या राजकीय स्टंटबाजीने अकलूजकरांची दिशाभूल करण्याचे उद्योग भाजपने त्वरित थांबवावेत, असा सज्जड इशारा दिला जात आहे.
Next Post

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!