Friday, September 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक

तरुण भारतbyतरुण भारत
September 3, 2026
in west maharashtra
0
रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक
0
SHARES
147
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अकलूज – सोलापूर ग्रामीण महासंघ जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांची विविध अडीअडचणी व प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक संपन्न झाली.
सांगोला पुरवठा विभागाचे अधिकारी रविकिरण शेटे यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत दुकानदारांनी आपल्या विविध समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा संघटना जिल्हा पातळीपासून मंत्रालय स्तरापर्यंत पाठपुरावा करीत असल्याचे विजय मंडलिक यांनी सांगितले.
सांगोला तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीमध्ये तालुक्यातील रेशन दुकानदारांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः रेशन कार्डधारकांसाठी उपलब्ध असलेल्या इष्टांकाचा प्रश्न गंभीर असल्याचे दुकानदारांनी निदर्शनास आणून दिले.
सांगोला तालुक्यात सध्या रेशन कार्डधारकांसाठी पुरेसा इष्टांक शिल्लक नसल्याने अनेक पात्र, गोरगरीब आणि गरजू लाभार्थी धान्यापासून वंचित राहत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. तसेच एखादा रेशन कार्डधारक मयत झाल्यानंतर किंवा कुटुंबातील मुलीचे लग्न झाल्यानंतर संबंधित इष्टांक कमी होतो; मात्र त्याजागी नवीन पात्र लाभार्थ्यांसाठी तो इष्टांक पुन्हा उपलब्ध करून दिला जात नसल्याची समस्या दुकानदारांनी मांडली.
याशिवाय सन २०२२ मध्ये चलनाद्वारे दुकानदारांनी भरलेली रोख रक्कम अद्याप मिळालेली नसल्याचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. ही रक्कम दुकानदारांची हक्काची असून ती लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी करण्यात आली. धान्य वितरणाचे मार्जिनही नियमितपणे आणि दर महिन्याला मिळावे, अशी मागणी दुकानदारांनी केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक यांनी दुकानदारांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेत त्यावर संघटनेच्या माध्यमातून प्रभावी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. ज्या-ज्या दुकानदारांचा जेवढा इष्टांक कमी झाला आहे, तेवढा इष्टांक संबंधित दुकानदारांना पुन्हा उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्था करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
सन २०२२ मध्ये चलनाद्वारे करण्यात आलेल्या रोख भरण्याच्या रकमेबाबत महासंघ जिल्हा संघटना जिल्हा पातळीपासून मंत्रालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे दुकानदारांची हक्काची रक्कम लवकरच मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे मंडलिक यांनी सांगितले.
मार्जिनच्या प्रश्नावरही संघटना सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा कार्यालयापासून मंत्रालयातील संबंधित वित्तीय कार्यालयापर्यंत पाठपुरावा करून रास्त भाव धान्य दुकानदारांना त्यांचे प्रलंबित मार्जिन मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. यापुढे धान्य दुकानदारांना दर महिन्याला नियमितपणे मार्जिन मिळावे, यासाठीही शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे मंडलिक यांनी सांगितले.
“तालुक्यातील कोणत्याही दुकानदाराच्या दुकानासंदर्भात वैयक्तिक अडचण किंवा प्रश्न असल्यास माझ्याशी थेट संपर्क साधावा. संबंधित अडचण सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून निश्चितपणे प्रयत्न करण्यात येतील,” असे आश्वासनही विजय मंडलिक यांनी दिले.
दरम्यान, बैठकीच्या वेळी सांगोला तालुका रेशन दुकानदार संघटनेच्या वतीने तालुकाध्यक्ष भगवान इंगोले यांच्या हस्ते महासंघ जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय मंडलिक, सांगोला पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षण अधिकारी रविकिरण शेटे, सांगोला पुरवठा निरीक्षक अधिकारी श्रीमती जाधव, मंगळवेढा तालुकाध्यक्ष महादेव माळी आणि पंढरपूर तालुक्याचे उपाध्यक्ष महावीर वाकसे यांचा सत्कार करण्यात आला.
या बैठकीस सांगोला तालुकाध्यक्ष भगवान इंगोले, शहराध्यक्ष चांडोले, सुनील माळी, मिलिंद रेडेकर, अरुण जाधव, अक्षय मिले यांच्यासह सांगोला पुरवठा विभागातील कर्मचारी तसेच सांगोला तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रेशन दुकानदारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासन आणि संघटनेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
Post Views: 222
Previous Post

बार्शीत मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन साजरा

Next Post

उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

ताज्या बातम्या

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

September 4, 2026
ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

September 4, 2026
श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

September 4, 2026

सोलापूरसह राज्यभरात एकांकिका स्पर्धेचे बिगुल

September 4, 2026
बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

September 4, 2026
आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

आरटीओ परिसरातील वृक्षतोडीला उपमहापौर देवकर यांनी केला अटकाव 

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव — डॉ. वीरभद्र दंडे

September 4, 2026
आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार मुक्कामी आपल्या गावी’ अभियानाला लऊळमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1162894

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!