श्रीपूर – श्रीपूर येथिल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक कै . सुधाकरपंत परिचारक यांच्या पश्चात चेअरमन प्रशांतराव परिचारक व यटोपिअन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या नेतृत्वात कारखाना प्रगती करत असताना चेअरमन प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधन होत असलेला प्रशांत क्रिडा महोत्सव म्हणजे सर्व सभासद ,अधिकारी व कामगार यांच्या एकात्मतेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ . यशवंत कुलकर्णी यांनी केले . हा महोत्सव दोन दिवस चालणार आहे .
यावेळी यरोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक,अकलुज पोलिस स्टेशनचे उपअधिक्षक संतोष वाळवे, पोलिस निरिक्षक नीरज उबाळे, कारखान्याचे व्हा . चेअरमन कैलास खुळे, माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे , प्रायोजक मृणाल इंडस्ट्रीजचे महेश मुळे , अविजचे काळे,क्रिडा समिती प्रमुख सचिन विभूते, उपाध्यक्ष डॉ . प्रमोद पवार उपस्थित होते
या प्रसंगी संतोष वाळके यांनी पांडुरंग कारखान्याची केवळ कुशल नेतृत्वा मुळेत प्रगती होऊ शकली त्याचेच उत्तम नियोजन म्हणजे ह्या क्रिडा स्पर्धा असल्याचे सांगितले .
याप्रसंगी पो. नि . निरज उबाळे, उमेश परिचारक यांनीही आपल्या मनोगता मध्ये कामगारांच्या सहश आरोग्यासाठी व ऐक्य भावना निर्माण होण्यास क्रिडा स्पर्धा महत्वाच्या असल्याचे सांगितले .
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ . सुधीर पोफळे यांनी केले .
. . . . . . .. .. . . . . . . . . .. . . . .. .. . . . . . . . . . . . . .. .. नेटक्या नियोजना मुळे रंगत. . . . . . . . . . पांडुरंग कारखान्याचा क्रिडा महोत्सव म्हणजे कार्यकारी संचालक डॉ यशवंत कुलकर्णी यांचे नेटके नियोजन असते त्यामुळे वातावरणामध्ये वेगळीच रंगत निर्माण होते . या स्पर्धे बरोबर सायकल स्पर्धाही घेण्यात याव्यात .
– – – – – – – – उमेश परिचारक, अध्यक्ष युटोपिअन शुगर्स .
Post Views: 9