या महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, तसेच आट्यापाट्या व रस्सीखेच या पारंपारिक मैदानी स्पर्धांचा समावेश आहे .
स्पर्धेच्या उद्घाटनात या स्पर्धांचे एटोपिअन शुगर्स चे अध्यक्ष उमेश परिचारक ,पोलिस उपयायुक संतोष वाळवे व पो. नि . निरज उबाळे यांनी पांडुरंग कारखान्याच्या स्पर्धा शिस्त, नियोजन व कामगांरामधील विजुगुषी वृत्ती मुळे परिपूर्ण असल्याने वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे म्हटले होते .
याचे प्रत्यंतर लगेचच दिसून आले
कामगारांच्या दोन संघामध्ये आट्यापाट्या चा सामना चालु झाला होता . या स्पर्धात नजरे बरोबर पायांच्या हालचालीसही महत्व असते . परंतू मैदानावर असलेले बारीक खडे खेळांडूंच्या पायास टोचत असून त्यांची एकाग्रता राहू शकत नाही हे स्पर्धा पाहत असलेल्या कार्यकारी संचालक यांच्या चाणक्ष नजरेने हेरली व त्यांनी तात्काळ पंचाना सामना थांबविणेची सुचना केली व तडक ग्राऊंड मध्ये जावून खडे वेचणेस सुरुवात केली . या बरोबर उपस्थित असलेले सर्वच अधिकारी व कामगारांनी अनुकरण करत खडे बाजूला काढणेस सुरुवात केली मग काय सर्वांचेच हात लागल्यावर काही क्षणातच ग्राऊंड चकाचक झाले . मग आट्यापाट्या स्पर्धा सुरळीत चालु झाल्या .
खेळाडूंना होत असलेला परंतू बोलून दाखवता न येणारा त्रास डॉ . यशवंत कुलकर्णी यांच्या संवेदनशिलते मुळे थांबला .
















