सोलापूर- मराठा सेवा संघाच्या दक्षिण भारत (आठ राज्ये) सचिवपदी राम गायकवाड व उपाध्यक्षपदी (कर्नाटक व तेलंगाणा) पोपट भोसले यांच्या निवडी झाल्याबद्दल मराठा सेवा संघ संचलित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेड सोलापूर शहर जिल्हयाच्यावतीने लक्ष्मीबाई मंडई येथे माजी महापौर अरिफ शेख यांच्या अध्यक्षतेखालील आणि परिवहन समिती माजी सभापती राजन जाधव यांच्या हस्ते राम गायकवाड व पोपट भोसले यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान, जिल्हाध्यक्ष म. शफीक रचभरे, बशीर सय्यद, कादर भागानगरी, माजी नगरसेवक हारुण शेख, राजू हुंडेकरी, तन्वीर गुलजार, गफूर शेख, रिजवान शेख, शब्बीर फुलमामडी, रियाज पैलवान, रिझवान दंडोती, शेरु उस्ताद, हारिस शेख, रुस्तुम शेख, तन्वीर शेख , इरफान बागवान आदी उपस्थित होते.
Post Views: 8