सोलापूर – ज्ञान हे गुरुच्या मार्गदर्शनामुळे मिळते. गुरु हा आपल्या जीवनाचा शिल्पकार असतो. मुलांनी गुरुकडून ज्ञान संपादन करुन स्वतःचे आयुष्य उज्ज्वल करावे*.*विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा मान राखावा* असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे फैय्याज शेख यांनी म.न.पा. मुलांची उर्दू केंद्र शाळा कॅम्प, लष्कर. येथे आयोजित शिक्षक दिनानिमित्त, शिक्षकांचा सत्कार करताना प्रतिपादन केले .
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापिका महेजबीन मुल्ला यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंचाचे कार्यवाह अरुण धुमाळ यांनी केले. रामकृष्ण अघोर,प्रा.धनंजय
शहा, यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले.अध्यक्षा
महेजबिन मुल्ला यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.
तसेच मनपा मुलींची मराठी केंद्र शाळा कॅम्प व मनपा मुलींची उर्दू केंद्र शाळा कॅम्प येथील शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला..
सदर प्रसंगी मुख्याध्यापिका रेहना नदाफ , मुख्याध्यापिका नाजनींन कोरबू व शाळेतील शिक्षका आरिफा शेख, रेहाना शेख, जिनत पटेल, फरहीन चौधरी, रिजवान दौलताबाद, रेश्मा पठाण ,रिजवान बेरिया ,सुनिता यादव, नईम मुच्छाले, यांचा सत्कार मंचातर्फे पेन, पुस्तक व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थी, पालक उपस्थित होते. कार्यक्रमास मंचाचे सदस्य प्रेमचंद मेने, प्रांजली मोहीकर, अशोक खानापुरे , मल्लिनाथ किणगी, उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अशोक म्हमाणे यांनी केले.
Post Views: 20