सोलापूर – चाळीसावी महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये येथील विराट करिअर अकॅडमीच्या खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी करत ६ पदकांची कमाई केली.
रत्नागिरीतील डेरवण येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत अकॅडमीच्या खेळाडूंनी ही कामगिरी केली. ६ पदकांमध्ये १ सुवर्ण, २ रौप्य आणि ३ कांस्य पदकांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंना एनआयएस कोच भारती लिंगडे व सूर्याजी लिंगडे यांचे मार्गदर्शन लाभले.
स्पर्धेतील उल्लेखनीय पदकविजेते खेळाडू:
स्वरा जाधव: लांब उडी शर्यतीत सुवर्ण.
पूजा राठोड: १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कांस्य आणि ४ बाय १০০ मीटर रिले प्रकारात रौप्य.
संध्या राठोड: लांब उडी प्रकारात कांस्य.
भक्ती थोरात: १०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्य.
कीर्ती तोडणकर: ४बाय १०० मीटर रिले प्रकारात रौप्य.
———

















