अक्कलकोट – प्रभाग क्रमांक ९ मधील राजीव नगर झोपडपट्टी, मौलाली गल्ली, खाटीक गल्ली,परिसरातील नागरिकांची पाण्यासाठी होणारी गैरसोय लक्षात घेऊन नगरसेवक तथा बांधकाम सभापती सद्दाम शेरीकर यांनी स्वखर्चातून बोर मारण्याचा निर्णय घेतला. दुष्काळाची परिस्थिती आणि पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेता प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये,या उद्देशाने त्यांनी पुढाकार घेतल्याने परिसरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.
पाणी ही नागरिकांची मूलभूत गरज असून, सध्याच्या पाणीटंचाईच्या परिस्थितीत राजीव नगर,मौलाली गल्ली, खाटीक गल्ली, परिसरातील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी सद्दाम शेरीकर यांनी स्वतःच्या खर्चातून बोरची सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले. त्यामुळे या उपक्रमाकडे केवळ पाण्याची सुविधा म्हणून नव्हे, तर नागरिकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा लोकहिताचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.
आज दुपारी ३:३० च्या सुमारास बोर मारण्याच्या कामाची सुरुवात अप्पू गोळे व लालापेशमाम यांच्या हस्ते पूजन व फातेहखानी करून करण्यात आली.
यावेळी प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले. स्वखर्चातून पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी नगरसेवक सद्दाम शेरीकर यांचे कौतुक केले.
यावेळी लालापेशमाम, गालिब काजी, सोहेल फरास, अश्फाक गोलंदाज,शब्बीर सुभेदार,शहानवाज गोलंदाज,नजीम पठाण, मोहम्मद पठाण, बुडन चाबुकस्वार, बशीर डांगे,रशीद चाबुकस्वार यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Post Views: 11