अकलूज – माळशिरस तालुक्यातील अकलूज येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सोमवारी दहावा दिवस होता. तब्येत खालावल्याने तसेच त्यांनी पाणी आणि सलाईनही बंद केल्याने मराठा समाजात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर माळशिरस तालूका अखंड मराठा समाजबांधवांनी अकलूज येथील अकलाई मंदिराजवळील अकलूज -टेंभुर्णी पालखी महामार्ग येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.
जरांगे-पाटील गेल्या दहा दिवसांपासून उपोषणावर असून
महाराष्ट्रातील विविध भागांतही आंदोलनाची तीव्रता वाढताना दिसत आहे. जरांगे-पाटील यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करत सरकारने तातडीने हस्तक्षेप करून चर्चेद्वारे आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मराठा समाजबांधवांनी केली. रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली
होती. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
माळशिरस तालुका अखंड मराठा समाजाने जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सहा दिवसांचा एल्गार पुकारला आहे.
खांद्यावर भगवी उपरणी आणि हातात भगवे ध्वज घेऊन मोठ्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते. ‘जय भवानी, जय शिवराय’, एक मराठा, कोटी मराठा’, ‘कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी पोलीस बंदोबस्त चोक होता मराठा समाजाचे कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे,गोपाळराव घाडगे बबनराव शेंडगे,रणजीत कदम माणिक मिसाळ, शिवाजी लोंढे, तानाजी इंगवले देशमुख, अशोक ढवळे, सचिन गायकवाड, योगेश शेंडगे अनिल कदम,भारत नगर कार्यकर्त्यांनी घोषणा देत मंडलाधिकारी सिद्धू भोसले यांना निवेदन दिले उद्या प्रांत कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आहे
Post Views: 16