सांगोला – कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४५ वा स्मृती समारोह निमित्त आयोजित पुरुषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात मुंबईच्या नागपाडा बास्केटबॉल अकॅडमीला ६०-५५ असे ५ गुणाने नमवित पुण्याच्या संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीने झपके कुटुंबीयांकडून दिले जाणारे गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषक व ३१ हजार रुपये पारितोषिक मिळवत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेमध्ये उपविजेता नागपाडा बास्केटबॉल अकॅडमी मुंबई, तृतीय नेक्सस स्पोर्टस् अकॅडमी नांदेड, चतृर्थ जयहिंद जिमखाना कडा बीड, पाचवे कॉर्टर फायनल मध्ये उपविजयी संघ जी.के.पी मुंबई, बीएससी बीइजी ४ सेंटर खडकी पुणे, श्री.केरळा वर्मा, त्रिसुर केरळ, एसएनसी नागपूर, सहावे साखळी सामन्यातील दुस-या क्रमांकाचा संघ हाथ फाय युथ फाउंडेशन मुंबई, टिम काश नागपूर, मस्तान वायसीएमए मुंबई, समायरा अकॅडमी मुंबई, ग्रीन स्टार स्पोर्टस् क्लब सोलापूर, डू ईट बास्केट बॉल अकॅडमी, कोल्हापूर, भारती विदयापीठ पूणे, शिवरत्न स्पोर्टस अकॅडमी अकलुज तसेच उत्कृष्ट खेळाडू फय्याज शेख नागपाडा, बेस्ट शुटर तनय तट्टे एसकेबीए पुणे, उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू श्ववण बनकर सांगोला यांना स्मृती चषक व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ५० वर्षांवरील ज्येष्ठ खेळाडूंचे मास्टर्स टीम तयार करून विशेष सामने खेळवले गेले. त्यामधील कोल्हापूर मास्टर्स संघ विजयी झाला. यावेळी सर्व सहभागी खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. सुरुवातीला गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कवी सुनील जवंजाळ लिखित विद्यामंदिर गीताच्या सादरीकरणाने झाली. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ड१ प्रांतपाल राजेंद्र शहा-कांसवा, रंजना कासवा, राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू राहुल भंडारे, भारतीय बास्केटबॉल संघाचे माजी कर्णधार संभाजी कदम, संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीचे संचालक शरद नागणे, लायन प्रांतीय खजिनदार सुरेश जाजू, संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, प्राचार्य चारुदत्त जगताप उपस्थित होते.
प्रास्ताविकातून प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी निश्चितपणे येणाऱ्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील आमचे विद्यार्थी, युवक या राष्ट्रीय स्पर्धेचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक घेतील असा विश्वास व्यक्त केला. राजेंद्र शहा-कांसवा यांनी सांगोल्यासारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्वरूपाच्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे भव्य आणि नियोजनबद्ध आयोजनाचे कौतुक केले. याप्रसंगी देणगीदार विलास क्षीरसागर, सुहास होनराव, श्रीनिवास देशपांडे, सिद्धार्थ झपके, ज्ञानेश्वर तेली, नागेश तेली, विवेक घोंगडे, संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य दिगंबर जगताप, शीलाकाकी झपके, विश्वेश झपके उपस्थित होते. सदरच्या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बास्केटबॉल नियोजन समितीचे सचिव प्रशांत मस्के व सर्व पदाधिकारी, विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले. पंच सत्कार व पारितोषिक समारंभाचे निवेदन प्रा.डी.के पाटील, सुनील भोरे, सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले. आभार प्रा.चारूदत्त जगताप यांनी मानले.
चौकट-
४५ वर्षांनंतरही गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे नाव आज आदराने घेतले जाते. त्यांच्या प्रेरणेने आणि दूरदृष्टीमुळेच विद्यार्थ्यांना आज उत्कृष्ट इनडोअर कोर्टसारख्या क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या योगदानाबद्दल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे विशेष आभार. संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमी विमाननगर, पुणे प्रमाणेच गुरुवर्य बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमीच्या टीमनेही भविष्यात अंतिम फेरीत जिंकून मोठे यश मिळवावे, हीच सदिच्छा.
-संभाजी कदम, मार्गदर्शक, भारतीय बास्केटबॉल संघ
Post Views: 39