Tuesday, September 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गुरुवर्य बापूसाहेब झपके राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा

तरुण भारतbyतरुण भारत
September 7, 2026
in west maharashtra
0
गुरुवर्य बापूसाहेब झपके राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगोला – कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४५ वा स्मृती समारोह निमित्त आयोजित पुरुषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात मुंबईच्या नागपाडा बास्केटबॉल अकॅडमीला ६०-५५ असे ५ गुणाने नमवित पुण्याच्या संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीने झपके कुटुंबीयांकडून दिले जाणारे गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती चषक व ३१ हजार रुपये पारितोषिक मिळवत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेमध्ये उपविजेता नागपाडा बास्केटबॉल अकॅडमी मुंबई, तृतीय नेक्सस स्पोर्टस् अकॅडमी नांदेड, चतृर्थ जयहिंद जिमखाना कडा बीड, पाचवे कॉर्टर फायनल मध्ये उपविजयी संघ जी.के.पी मुंबई, बीएससी बीइजी ४ सेंटर खडकी पुणे, श्री.केरळा वर्मा, त्रिसुर केरळ, एसएनसी नागपूर, सहावे साखळी सामन्यातील दुस-या क्रमांकाचा संघ हाथ फाय युथ फाउंडेशन मुंबई, टिम  काश नागपूर, मस्तान वायसीएमए मुंबई, समायरा अकॅडमी मुंबई, ग्रीन स्टार स्पोर्टस् क्लब सोलापूर, डू ईट बास्केट बॉल अकॅडमी, कोल्हापूर, भारती विद‌यापीठ पूणे, शिवरत्न स्पोर्टस अकॅडमी अकलुज तसेच उत्कृष्ट खेळाडू फय्याज शेख नागपाडा, बेस्ट शुटर तनय तट्टे एसकेबीए पुणे, उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू श्ववण बनकर सांगोला यांना स्मृती चषक व रोख रक्कम मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ५० वर्षांवरील ज्येष्ठ खेळाडूंचे मास्टर्स टीम तयार करून विशेष सामने खेळवले गेले. त्यामधील कोल्हापूर मास्टर्स संघ विजयी झाला. यावेळी सर्व सहभागी खेळाडूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. सुरुवातीला गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कवी सुनील जवंजाळ लिखित विद्यामंदिर गीताच्या सादरीकरणाने झाली. यावेळी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय लायन्स संघटना प्रांत ३२३४ड१ प्रांतपाल राजेंद्र शहा-कांसवा, रंजना कासवा, राष्ट्रीय बास्केटबॉल खेळाडू राहुल भंडारे, भारतीय बास्केटबॉल संघाचे माजी कर्णधार संभाजी कदम, संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमीचे संचालक शरद नागणे, लायन प्रांतीय खजिनदार सुरेश जाजू, संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, प्राचार्य चारुदत्त जगताप उपस्थित होते.
प्रास्ताविकातून प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी निश्चितपणे येणाऱ्या काही वर्षांमध्ये ग्रामीण भागातील आमचे विद्यार्थी, युवक या राष्ट्रीय स्पर्धेचे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक घेतील असा विश्वास व्यक्त केला. राजेंद्र शहा-कांसवा यांनी सांगोल्यासारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या स्वरूपाच्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे भव्य आणि नियोजनबद्ध आयोजनाचे कौतुक केले. याप्रसंगी देणगीदार विलास क्षीरसागर, सुहास होनराव, श्रीनिवास देशपांडे, सिद्धार्थ झपके, ज्ञानेश्वर तेली, नागेश तेली, विवेक घोंगडे, संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य दिगंबर जगताप, शीलाकाकी झपके, विश्वेश झपके उपस्थित होते. सदरच्या क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बास्केटबॉल नियोजन समितीचे सचिव प्रशांत मस्के व सर्व पदाधिकारी, विद्यामंदिर परिवारातील सर्व प्रशासकीय वर्ग, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले. पंच सत्कार व पारितोषिक समारंभाचे निवेदन प्रा.डी.के पाटील, सुनील भोरे, सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले. आभार प्रा.चारूदत्त जगताप यांनी मानले.
चौकट-
४५ वर्षांनंतरही गुरुवर्य बापूसाहेब झपके यांचे नाव आज आदराने घेतले जाते. त्यांच्या प्रेरणेने आणि दूरदृष्टीमुळेच विद्यार्थ्यांना आज उत्कृष्ट इनडोअर कोर्टसारख्या क्रीडा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या योगदानाबद्दल प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे विशेष आभार. संभाजी कदम बास्केटबॉल अकॅडमी विमाननगर, पुणे प्रमाणेच गुरुवर्य बापूसाहेब झपके स्पोर्ट्स अकॅडमीच्या टीमनेही भविष्यात अंतिम फेरीत जिंकून मोठे यश मिळवावे, हीच सदिच्छा.
-संभाजी कदम, मार्गदर्शक, भारतीय बास्केटबॉल संघ
Post Views: 40
Previous Post

अकलूज येथील अकलाई मंदिरा नजीक अकलूज-टेंभूर्णी पालखीमहा मार्गावर रास्ता रोको

Next Post

पानगाव येथे श्री गोपाळकृष्ण जन्माष्टमी सप्ताह उत्साहात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पानगाव येथे श्री गोपाळकृष्ण जन्माष्टमी सप्ताह उत्साहात

पानगाव येथे श्री गोपाळकृष्ण जन्माष्टमी सप्ताह उत्साहात

ताज्या बातम्या

गोकुळ शुगरच्या थकीत बिलासाठी शेतकरी चढले चक्क झाडावर #viral #solapurnews #news #marathinews

September 7, 2026
बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या ७ खेळाडूंची श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल  स्पर्धेसाठी निवड

बार्शीच्या विश्वजीत रोलर स्केटिंग क्लबच्या ७ खेळाडूंची श्रीलंका येथे होणाऱ्या इंटरनॅशनल  स्पर्धेसाठी निवड

September 7, 2026
‘हाताला काम द्या, नाहीतर पोटाला धान्य द्या!’ – वैरागमध्ये ८ हुतात्म्यांच्या बलिदानाला मूक मोर्चाने भावपूर्ण अभिवादन

‘हाताला काम द्या, नाहीतर पोटाला धान्य द्या!’ – वैरागमध्ये ८ हुतात्म्यांच्या बलिदानाला मूक मोर्चाने भावपूर्ण अभिवादन

September 7, 2026
बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणारा रिक्षाचालक शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद – चोरलेला मुद्देमाल हस्तगत

बस स्थानकावर प्रवाशांचे दागिने चोरणारा रिक्षाचालक शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद – चोरलेला मुद्देमाल हस्तगत

September 7, 2026
सोलापूर विद्यापीठ, उद्यम फोंडेशन आणि जीतो सोलापूर यांच्यात सामंजस्य करार 

सोलापूर विद्यापीठ, उद्यम फोंडेशन आणि जीतो सोलापूर यांच्यात सामंजस्य करार 

September 7, 2026
कष्टाने फुलवलेली तोंडल्याची बाग एका रात्रीत उद्ध्वस्त; शेतकऱ्याच्या स्वप्नांवर कोयत्याचा घाव!

कष्टाने फुलवलेली तोंडल्याची बाग एका रात्रीत उद्ध्वस्त; शेतकऱ्याच्या स्वप्नांवर कोयत्याचा घाव!

September 7, 2026
खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा माढा दौरा; प्रवासी वेल्फेअर असोसिएशनकडून निवेदन

खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांचा माढा दौरा; प्रवासी वेल्फेअर असोसिएशनकडून निवेदन

September 7, 2026

 वाढीव निधीच्या प्रतीक्षेत कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या योजना

September 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1174686

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!