माळशिरस … माळशिरस विधानसभा मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून याबाबत
दावे हरकतीसाठी ३० सप्टेबर पर्यत मुदत आहे. अशी माहिती प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी दिली.
मतदारांनी प्रारूप यादीमध्ये आपले नाव पत्ता वय लिंग मतदार ओळखपत्र तपासून घ्यावे यामध्ये त्रुटी असल्यास .नाव समाविष्ट नसल्यास विहित नमुन्यात अर्ज दाखल करावा . सदरच्या दावे हरकती३० सप्टेवरपर्यत दाखल करावेत ३१ते ऑगस्ट २९ ऑक्टोबर या कालावधीत दावे व हरकती यावर सुनावणी व निर्णय घेतले जाणार आहेत. नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२ ६ किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना अर्ज दाखल करता येणार आहे. तरी नागरिकांनी मतदार यादी पाहून आपल्या व कुंटुबाची माहिती तपासावी असे अहवा न प्रांताधिकारी पांगारकर यांनी केले आहे.
Post Views: 16