जेऊर – जागतिक पातळीवरील स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ. गणेश भाऊ करे पाटील यांनी जेऊर ता करमाळा नवभारत इंग्लिश स्कूलच्या वतीने करमाळा तालुक्यातील पहिल्या ए. आय व रोबोटिक्स लॅबचे उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना केले या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील, माजी उपसभापती अतुल पाटील डॉ सुभाष सुराणा उपस्थित होते पुढे बोलताना करे पाटील म्हणाले की आज अनेक देशांची मोठी प्रगती झाल्याची आपण पाहतो त्याच्या मागे त्या देशांमध्ये विद्यार्थ्यांना मिळत असलेले शिक्षण हे महत्त्वाची बाब असून जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्या देशातही तशाच प्रकारच्या दर्जेदार शिक्षणाची गरज आहे या दृष्टीने नवभारत इंग्लिश स्कूल या शाळेने टाकलेले हे पहिले पाऊल असून ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेलगाव येथील कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख अधिकारी डॉ शहाजी नवले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप चिंचकर यांनी केले. या कार्यक्रमावेळी मुख्याध्यापिका दिपाली चिंचकर यांनी ए.आय व रोबोटिक सायन्स याचे शालेय शिक्षणामध्ये असलेले महत्त्व याविषयी माहिती दिली डॉ सुभाष सुराणा,यशवंत क्लासेसचे जयेश पवार ,अतुल पाटील यांची भाषणे झाली या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर गोडसे,शेलगावचे सरपंच अमर ठोंबरे शेटफळचे माजी सरपंच पांडुरंग लबडे, दादासाहेब लबडे, शंकर पोळ, गजेंद्र पोळ, नागनाथ केकान,अजित नाईकनवरे सिताराम पोळ यांच्यासह या परिसरातील लोक सर्व शिक्षक व पालक व संख्येने उपस्थित होते