सोलापूर – भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सोलापूर पूर्व जिल्ह्याच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून मंद्रूपचे ग्रामपंचायत सदस्य शिवपुत्र जोडमोटे यांची महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप किसान मोर्चाचे सोलापूर पूर्व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ गायकवाड यांनी ही निवड जाहीर केली.
आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते जोडमोटे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ करून दाखवेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आणि थेट गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे. किसान मोर्चाच्या माध्यमातून आम्ही थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊ आणि ते सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे जोडमोटे यांनी सांगितले.
Post Views: 11