वळसंग – वळसंग तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री गुरु महंतेश्वर हिरेमठ संस्थान व श्री गुरु मळेंद्र शिवाचार्य संस्थान हिरेमठ अफजलपुर चे श्रीमद वीरशैव महामत संस्थापनाचार्य श्री जगद्गुरु रेणुकादि पंचाचार्य परंपरागत श्रीमद उज्जैन सधर्म सिंहासन शाखा हिरेमठ अफजलपुर येथे श्री श्री श्री १००८ सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य भागवतपाद उज्जैन महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ष.ब्र. विश्वाराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांचे अड्ड पालखी महोत्सव सोमवार दिनांक १४ सप्टेंबर रोजी अफजलपुर येथे संपन्न होणार आहे.
रविवार रोजी १३ सप्टेंबर सकाळी ०८.००वा. जंगम वटुंना आय्याचाऱ्य व उज्जैन जगद्गुरु यांचे इष्ट लिंग पूजा संपन्न होईल.सोमवार दि.१४ सप्टेंबर रोजी पहाटेपासून महापूजा सकाळी १०.०० वा. सुहासिनी कडून भीमा नदीतील १००८ कुंभाभिषेक त्यानंतर सकाळी ११.०० वा. अड्डा पालखी गावातील मुख्य रस्त्यावरून निघणार आहे. दिवसभर पालखी मिरवणूक झाल्यानंतर सायंकाळी ०७.०० वा. परत मठामध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर रात्री ०८.०० वा. धर्मसभा संपन्न झाल्यानंतर कडकोळ श्री मडिवाळेश्वर महापुराण मंगल तसेच कार्यक्रमाचा समारोप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी कर्नाटक व महाराष्ट्रातील सर्व भक्तगणांना स्वागत असेल तसेच येणाऱ्या सर्व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था राहील असे श्री ष.ब्र. विश्वाराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी सांगितले.
या कार्यक्रमांमध्ये अनेक गावातील भजनामंडळ, वाद्य मंडळ, झांज पथक, लेझीम पथक तसेच विविध कलाकारांनी आपले कला दाखवतील. या कार्यक्रमाचे नियोजन श्री गुरु मळेंद्र शिवाचार्य संस्थान हिरेमठ, पुराण समिती पालखी महोत्सव समिती व समस्त सदभक्त मंडळी अफजलपुर यांचे सहकार्याने संपन्न होणार आहे.
Post Views: 3