माळशिरस – गणेशोत्सवाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी सांगून गणेशोत्सव मंडळे, कार्यकर्ते व नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, ध्वनिक्षेपक व मिरवणुकीसंदर्भातील नियमांचे पालन करावे तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सव २०२६ हा उत्सव शांततामय, सुरक्षित व सुव्यवस्थित वातावरणात पार पडावा, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी माळशिरस पोलीस ठाणे विभागाच्या वतीने अज पोलीस रूट मार्चचे आयोजन करण्यात आले.
सदर रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके ,पोलीस उपअधीक्षक माळशिरस पोलीस ठाणे, एस आर नवले, एस आर पी एफ एक सेक्शन, प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी, माळशिरस पोलीस ठाणे कडील पोलीस अधिकारी अंमलदार, होमगार्ड माळशिरस पथक व वाहतूक पोलीस कर्मचारी व इतर संबंधित कर्मचारी सहभागी झाले होते.
तसेच माळशिरस पोलीस ठाणे हद्दीतील गणेश मंडळ अध्यक्ष व कार्यकर्ते यांची माळशिरस पोलीस ठाणे येथील मीटिंग हॉल येथे बैठक घेतली सदर वेळी मा. वाळके साहेब एसडीपीओ अकलूज, नवले साहेब पोलीस उपअधीक्षक माळशिरस पोलीस ठाणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. वरिष्ठांच्या आदेशानुसार डीजे मुक्त गणेश उत्सव, एक गाव एक गणपती, पारंपारिक वाद्यांचा वापर करणे. तसेच गणेशोत्सव अनुषंगाने माळशिरस शहरातील महत्त्वाचे गणेश मंडळ, इस्लामपूर, गोरडवाडी, गारवाड, सदाशिवनगर, कचरेवाडी, खडूस व तरंगफळ या ठिकाणी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सोबत बैठका घेण्यात आल्या.
चौकट
पोलीस प्रशासनाकडून नगरपालिका, PWD विभाग तसेच MSEB विभाग यांच्याशी बैठका घेऊन गणपती रूट वरील अडथळा व रस्ते दुरुस्ती साठी आदेश दिले आहेत .तसेच बस स्थानकासमोर गणेश मूर्ती खरेदीसाठी होणारी गर्दी,वाहतुकीस अडथळा होऊ नये यासाठी गणेशमूर्ती विक्रीसाठी बाजार तळ केली जाणार आहे.
Post Views: 16