सोलापूर – २० व्या शतकातील प्रथमाचार्य, प्रातःस्मरणीय, चारित्र्य चक्रवर्ती, समाधीस्थ प.पू. १०८ प्रथमाचार्य श्री शांतिसागरजी महाराज यांच्या ७१ व्या पुण्यतिथी निमित्त आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी आस्था सामाजिक संस्थेचे अध्यक्ष *आनंद तालिकोटी*, संचालक *वेदांत तालिकोटी*, प्रसिद्धी प्रमुख *सुहास छंचुरे*, *पिंटू कस्तुरे, सुरज छंचुरे, उदय छंचुरे* यांच्या हस्ते आचार्यश्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना अध्यक्ष आनंद तालिकोटी म्हणाले की, आचार्य श्री शांतिसागरजी महाराज हे २० व्या शतकातील दिगंबर जैन परंपरेचे पहिले आचार्य होते. त्यांनी उत्तर भारतात लुप्त पावलेली मुनी दीक्षा परंपरा पुन्हा सुरू केली. “अहिंसा परमो धर्म:” हा त्यांनी दिलेला संदेश आजच्या भौतिकवादी युगात अधिक महत्त्वाचा आहे. त्यांचे संपूर्ण जीवन त्याग, संयम आणि अपरिग्रहाचे प्रतीक होते.
१९१५ ते १९५५ या काळात त्यांनी पायी विहार करत जैन धर्म, जीवदया आणि मानवता याचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. त्यांचे विचार आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या कार्यक्रमास आस्था सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views: 3