बार्शी – तालुक्यातील उपळे दुमाला गावची कन्या राजश्री शिवाजी भोसले यांनी महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट-क परीक्षेत यश संपादन करत कर निर्धारण अधिकारी पदावर निवड मिळवली आहे. या यशामुळे उपळे दुमाला गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून गावात आनंदाचे वातावरण आहे.
राजश्री भोसले यांनी बार्शी येथील शिवाजी महाविद्यालयातून बी.एस्सी. पदवी पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याचा निर्धार केला. सन २०२०-२१ मध्ये पुणे येथील युनिक अकॅडमीमध्ये एक वर्ष मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात राहून स्वअभ्यासाच्या जोरावर सातत्याने मेहनत घेतली.
त्यांच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणून महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा (गट-क) २०२३-२४ परीक्षेत २०० पैकी तब्बल १७६ गुण मिळवत त्यांनी कर निर्धारण अधिकारी पदावर यशस्वी निवड मिळवली.
Post Views: 7