बार्शी – कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल-तोलार बांधवांचा मेळावा बाजार समितीच्या सेल हॉल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सोलापूर जिल्हा विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला. यावेळी हमाल-तोलार बांधवांच्या विविध अडचणी, त्यांच्या हक्काचे मानधन, विमा संरक्षण आणि बाजार समितीतील सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर कार्यक्रमात बाजार समितीमध्ये अनेक वर्षे प्रामाणिक सेवा बजावणारे ज्येष्ठ हमाल कामगार रामहरी गात, नाना काळे, जगन्नाथ मांगडे, धनाजी वाघ, श्रीहरी भोळे, जगन्नाथ यादव यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले की, हमाल-तोलार हा बाजार समितीचा कणा आहे. त्यांच्या कष्टावरच शेतकऱ्याचा माल बाजारात येतो. तुमच्या घामाचे मोल झालेच पाहिजे. तुमच्या प्रत्येक अडचणीत राजाभाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. बाजार समितीमधील ज्येष्ठ कामगारांनी आपल्या आयुष्याची अनेक वर्षे बाजार समितीच्या सेवेत घालवली आहेत. त्यांच्या अनुभवाचा आणि कष्टाचा आदर करणे हे आपले कर्तव्य आहे.
या मेळाव्याला सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, बाजार समितीचे सभापती विजय गरड, संचालक रामेश्वर पाटील, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष दिलीपशेठ गांधी, खडकलगावचे माजी सरपंच दिपक रोंगे, सचिव तुकाराम जगदाळे, शिवाजी शिंदे, सुभाष लोमटे, राजकुमार घायाळ, आप्पा खताळ, गोरख मेंगडे, गोरख जगताप, गजेंद्र मुकटे, दिगंबर भोसले, प्रकाश ठोंगे, राजेंद्र मदने, चंद्रकांत मांजरे तसेच संचालक, सचिव आणि हमाल-तोलार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 6