सोलापूर : सोलापूरचे प्रसिद्ध कवी, पत्रकार, नाटककार आणि साहित्य शिक्षक स्व. बशीर परवाज़ यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी सोलापूर उर्दू घर येथे एका श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी आखिल भारतीय साहित्य संमेलनचे अध्यक्ष ॲड. उमर खान बेरिया हे होते.
यावेळी व्यासपीठावर बशीर परवाज़ यांचे भाऊ कवी मीर अफज़ल, कलबुर्गीचे चाँद अकबर, कवी आरजू राजस्थनी, राजा बागबान, साहीर नदाफ, डॉ. हारून रशीद बागबान आदी उपस्थित होते.
प्रारंभी उर्दू घरचे सदस्य सरफराज बल्लोलखान यांनी कुरान पठण करून कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर उर्दू घरचे सदस्य मोहम्मद अयाज़ यांनी हम्द – इश्स्तवन “अझ्म-ए-मुहकम अता कर खुदाया” सादर केली. त्यानंतर, उर्दू घरच्या सदस्या डॉ. सुमय्या बागबान यांनी ‘नाअत’ सादर केली. याप्रसंगी उर्दू घरचे सदस्य डॉ. आसिफ इक्बाल, मोहम्मद हनीफ बक्षी, शहाबुद्दीन चितापुरे, राजा बागबान, अय्युब अहमद नालमंदू, शफी कॅप्टन, डॉ. सिराज मोमीन, अशफाक ज़ैद, डॉ. अब्दुल रशीद शेख, चांद अकबर (गुलबर्गा), डॉ. इस्माईल शेख, मुख्तार गुलबग्वी आणि मीर अफजल यांनी स्व. बशीर परवाज़ यांच्याबद्दलचे विचार व आठवणींना उजाळा दिला, तसेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि साहित्यिक योगदानावर प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात ॲड. उमर खान बेरिया यांनी स्व. बशीर परवाज़ यांच्या निधनाला “एका युगाचा अंत” असे संबोधले. बशीर परवाज़ यांनी आपल्या विद्वत्तापूर्ण, साहित्यिक, शैक्षणिक आणि नाटक क्षेत्रातील कार्याद्वारे सोलापूरच्या साहित्यिक विश्वात एक महत्त्वपूर्ण आणि कायमस्वरूपी ठसा उमटवला होता. त्यांनी ‘अखिल भारतीय उर्दू साहित्य संमेलना स्व. बशीर परवाज़ यांच्याशी आलेल्या सहवासाच्या आठवणींनाही उजाळा दिला आणि त्यांच्या योगदानाबद्दल आदरांजली वाहिली.
यावेळी शफी कॅप्टन, रफीक खान, शफी शत्तारी, इक्बाल बागबान, युसूफआलम सिद्दीकी, अ. शुकूर शअूर, बशीर इंडीकर, अख्तर शेख, जाकीर जानवाडकर, जफर इंडीकर, सुहेल शेख, शादाब पितापुरी, इस्हाक बाटघर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ‘उर्दू घर’चे सदस्य आणि संयोजक डॉ. हारून रशीद बागबान यांनी केले. शेवटी ‘उर्दू घर’चे सदस्य डॉ. शफी चोबदार यांनी आभार मानले.