पंढरपूर – श्री गणेश चतुर्थीच्या निमित्ताने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस आकर्षक व पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले. पारंपरिक अलंकारांनी सजलेले श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी तसेच दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, कौस्तुभ मणी, दंडपेट्या जोड मोठा, हिऱ्याचे कंगन जोड, नाम निळाचा, शिरपेच लहान, मोत्याची कंठी एक पदरी, मोत्याची कंठी दोन पदरी, मत्स्य जोड, सोन्याचा पितांबर, शालिग्राम हार, तोडे जोड, हायकोल, नऊ पदरी चंद्रहार, पाच पदरी चंद्रहार, तुळशीची माळ एक पदरी, चार पदरी मोहरमाळ आदी पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले.
तसेच रुक्मिणी मातेस सोन्याचा मुकुट, वाक्या जोड, तोडे जोड, तानवड जोड, चिंचपेटी तांबडी, जवमणी पदक, जाव्याच्या माळा, लक्ष्मीहार, मोहरांची माळ, पुतळ्यांची माळ, हायकोल, सरी व कंबरपट्टा आदी पारंपरिक सुवर्ण अलंकार परिधान करण्यात आले.
या अलंकारांमुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे रूप अधिकच मनोहारी व भक्तिमय दिसत असून, भाविकांमध्ये या अलंकारांचे विशेष आकर्षण पाहायला मिळत असले बाबतची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.
Post Views: 7