सांगोला – तालुक्यातील कोळा पाचेगाव बुद्रुक किडबिसरी जुनोनी कराडवाडी कोंबडवाडी जुजारपूर हटकर मंगेवाडी हातीद सांगोल्याच्या पश्चिम भागात कोळा जिल्हा परिषद गटात आपल्या लाडक्या विघ्नहर्त्या श्री गणरायाचे अत्यंत मंगलमय, आनंदमय आणि भक्ती-उत्साहाच्या वातावरणात आगमन झाले आहे.घरोघरी आनंद: लाडक्या बाप्पाच्या स्वागताने अवघे घर आणि परिसर सकारात्मक ऊर्जेने व भक्तीभावाने भरून गेला आहे.सुख-समृद्धीची प्रार्थना: गणरायाच्या कृपेने आपल्या व आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या आयुष्यात सुख, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि शांती नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना भाविक भक्त गणराया कडे करत असल्याचे दिसुन आले.भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्त्या श्री गणरायाचे रविवारी घरोघरी जल्लोषात आगमन झाले आहे. गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर घरोघरी, तसेच सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात स्थापना झाली. दिवसभर लाडक्या बाप्पाला घरी आणण्यासाठी भाविकांची मोठी लगबग पाहायला मिळाली.ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आणि फटाक्यांच्या आतषबाजीत लाडक्या गणरायाची मूर्ती नेताना अनेक भाविक दिसत होते. पारंपारिक वेश परिधान करून गणरायाची मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी घेऊन जाताना दिसून आले.वर्षभर आतुरतेने वाट पाहणाऱ्या भाविकांच्या आनंदाला उधाण आले असून, पारंपरिक पद्धतीने तालावर घरोघरी आणि सार्वजनिक मंडपात आरतीचे सूर घुमणार आहेत.
Post Views: 8