Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर शहर आणि तालुक्यात उत्साहात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना

तरुण भारतbyतरुण भारत
September 14, 2026
in west maharashtra
0
पंढरपूर शहर आणि तालुक्यात उत्साहात घरगुती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठापना
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरयाच्या गजरात शहरातील घरगुती गणपतीं बरोबरच विविध सार्वजनिक मंडळाच्या गणेशाच्या मुर्तींची सोमवारी (ता.१४) मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पंढरपूर शहर व तालुक्यातील ४२१ सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी करून श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. दरम्यान उत्सवाचा राजा समजल्या जाणाऱ्या या गणेशोत्सवास आजपासून सुरुवात झालेली आहे. त्यामुळे येथुन पुढे अकरा दिवस शहरात सार्वजनिक मंडळांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दरम्यान गणेशचतुर्थी निमित्त सोमवारी सकाळ पासूनच येथील भादुले चौक, कुंभारगल्ली, स्टेशन रस्ता, इंदिरागांधी भाजी मंडई, नाथचौक परिसर या भागातून गणेशाच्यामुर्ती खरेदीसाठी नागरिकांची तसेच शहरातील विविध सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांची गर्दी झालेली होती. घरगुती गणेशमुर्तींची प्रतिष्ठापना दुपार पर्यंत करण्यात येत होती. त्यामुळे बाजारपेठेत घरातील वडीलधाऱ्या मंडळीं बरोबरच पारंपारिक वेशभुषेत महिला तसेच बच्चेकंपनी देखील उत्साहात गणेशमुर्तीची खरेदी करताना दिसत होते. या वेळी लहानमुलांनी गणपती बाप्पा मोरया अशी अक्षरे लिहिलेल्या केशरी रंगाच्या रिबिन्स कपाळाभोवती गुंडाळल्याचे दिसत होते. विविध शाळांमधील विद्यार्थी देखील आपल्या शिक्षकांसमवेत मोठ्या उत्साहात आपआपल्या शाळांचे गणवेश परिधान करुन गणेशमुर्ती शाळेकडे नेताना दिसत होते.
शहरातील अनेक मंडळांनी यावर्षी खास पेण, पुणे, नगर, सांगली आणि कोल्हापूर येथून गणेशाच्या मुर्ती आणलेल्या दिसत आहेत. गणेशनगर, मनिषानगर, इसबावी, कोर्टी रस्ता, लिंकरोड, टाकळीरोड, सांगोलारस्ता, वाखरी रस्ता, मंगळवेढा रस्ता आदी ठिकाणांसह उपनगरातील बऱ्याच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते सायंकाळी पाच ते सहा वाजे पर्यंत गणेशमुर्तीची वाजतगाजत मिरवणूक काढून आपआपल्या मंडळामध्ये गणेशमुर्तीची विधीवत पुजा करुन प्राणप्रतिष्ठापना करीत होते. मात्र शहरातील मोठ्या सार्वजनिक मंडळाच्या गणेशमुर्तींची रात्री नऊ, साडेनऊ वाजे पर्यंत प्रतिष्ठापना करण्यात येत होती.
घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणेशाच्या मुर्तीच्या आरासासाठी लागणारे विविध प्रकारचे आरास साहित्यांचे स्टाँल्स देखील बाजारपेठेत दिसत होते. या स्टाँल्स वरुन खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या, मखर, देवघर, गणेशाच्या पाठीमागे लावण्यासाठी लागणारी रंगीबेरंगी चक्रे, लाईटच्या माळा, रंगीबेरंगी दिवे, सोन्या, चांदीसारखे टोप,मोत्यांच्या माळा अशा विविध आकर्षक वस्तुंची देखील रेलचेल दिसत होती.
दरम्यान येथील भादुलेचौक, नाथचौक या परिसरात मोठ्या प्रमाणावर गणेशमुर्तींच्या विक्रीसाठी स्टाँल्स लावण्यात आलेले होते. या ठिकाणी नागरिकांची सकाळ पासून गणेशमुर्ती खरेदीसाठी गर्दी झाली होती. या भागात वाहतूकीची कोंडी होवू नये यासाठी शहर पोलिसांनी दुचाकी तसेच मोठ्या वाहनांना बंदी केली होती.त्यामुळे या भागात कुठेही फारशी वाहतूकीची कोंडी झाली नाही.
येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शहर, तालुका आणि ग्रामीण पोलिसांनी आपआपल्या कार्यक्षेत्रात सर्वत्र शांतते मध्ये आणि भक्तीमय वातावरणात तसेच डाँल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी मंडळांतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केलेले आहे. या बरोबरच शहर आणि तालुक्यात गणेशोत्सव शांततमध्ये साजरा होण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याचे दिसत आहे.
————————–
चौकट :  ( शहरात १४० सावर्जनिक गणेशोत्सव मंडळे )
पंढरपूर शहर व तालुक्यातील ४२१ सार्वजनिक गणेश मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी करून श्रींची प्रतिष्ठापना केली आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील ८ गावांमधुन ‘एक गाव, एक गणपती’ या संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. या बरोबरच पंढरपूर शहरात १४० सार्वजनिक गणेश मंडळे गणेशोत्सव साजरा करत आहेत.
———————
चौकट : ( शहर व तालुक्यातील नोंदणी केलेल्या मंडळांची संख्या )
पंढरपूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत १४० सार्वजनिक गणेश मंडळे, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत ५० गावात १०१ गणेश मंडळे तर आठ गावांमधून एक गाव एक गणपती संकल्पनेतून गणेशोत्सव साजरा होत आहे. या बरोबरच पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत २४ गावात १३० गणेश मंडळांची नोंदणी झालेली असून जैनवाडी या एका गावात एक गाव एक गणपतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बरोबरच करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत २७ गावात ५० सार्वजनिक मंडळांनी परवानगी घेतली आहे.
Post Views: 8
Previous Post

स्वामिनीराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा

Next Post

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना

ताज्या बातम्या

कंदलगाव, गुंजेगावात महिनाभर पाणी, मग मंद्रूपचे शेतकरी पाण्यापासून वंचित का ?

September 14, 2026
देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

देशाला दिशा देण्याचे काम आटपाडी तालुक्यातील ज्येष्टांनी करावे

September 14, 2026
कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयामध्ये श्री गणेश प्रतिष्ठापना व मिरवणूक उत्साहात

September 14, 2026
सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

सलग 25 व्या वर्षी इंडियन मॉडेल स्कूलमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत….!

September 14, 2026

आजोबा गणपतीचे थाटात झाले पूजन ….#viral #solapurnews #aajsolapur #latestnews #maazsolapur

September 14, 2026

अज्ञात कारणावरुन कोरफळे येथे महिलेची आत्महत्या

September 14, 2026

अलीपूर येथून २६ वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

September 14, 2026

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीचे शोषण

September 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207747

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!