अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातील श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात पार्थिव गणपतीची सालाबादप्रमाणे यंदाही मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री गणेश उत्सव – २०२६ मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. चि. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले व कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते सोमवारी सकाळी गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत पूजा, अभिषेक करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध धार्मिक विधिवत पूजा न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्याकडून करण्यात आली.*
या प्रसंगी न्यासाच्या वतीने चि. हर्षवर्धनराजे अमोलराजे भोसले व कु. स्वामिनीराजे अमोलराजे भोसले यांचा सत्कार न्यासाचे उपाध्यक्ष- अभय खोबरे यांच्या उपस्थितीत सचिव- शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपा वस्त्र देऊन करण्यात आला.
*श्री शमी विघ्नेश गणेश मंदिर:-*
श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे सन १९८८ च्या श्री गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. त्या नंतरच्या काळात न्यासाच्या आवारात सन १९९० साली जमिनीची झाडी, झुडपे काढून साफ-सफाई व सपाटीकरण करीत असताना जमिनीच्या मध्यवर्ती भागात शमीवृक्ष आढळला. तेथे सपाटीकरण करते वेळेस श्री गणेशाची सुंदर मूर्ती आढळली. त्याच शमीवृक्षाखाली ३५ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर बांधण्यात आले आहे.
चौकट :
*नित्य पूजा अर्चा:-*
या मंदिरात नित्य पूजा अर्चा, अभिषेक, अथर्वशीर्ष अभिषेक (२१ व १०० आवर्तने), सहस्त्र दुर्वार्चन, गणेश याग अशी सेवा करण्यात येते. संकष्टी व अंगारकी चतुर्थीला श्रीक्षेत्र अक्कलकोटातील गणेश भक्तांकडून आरती करण्यात येते.
या प्रसंगी न्यासाचे विश्वस्त संतोष भोसले, निखील पाटील, प्रविण घाटगे, मुख्य आचारी बाळासाहेब पोळ, मुख्य सुरक्षा रक्षक महादेव अनगले, अनिल गवळी, अप्पा हंचाटे, श्रीशैल कुंभार, बाळासाहेब घाडगे, संभाजीराव पवार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, गणेश पाटील, मेघराज कोंपा, सिध्दाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, महांतेश स्वामी, चंद्रकांत हिबारे, धनंजय निंबाळकर, रमेश हेगडे, तानाजी पाटील, राजू पवार, धानप्पा उमदी, एस.के. स्वामी, शिव स्वामी, श्रीकांत स्वामी, मारुती बोरकर, बसवराज क्यार, सागर पवार, विलासराव रेड्डी, शुभम सावंत, संभाजी पवार, प्रकाश माने, स्वामिनाथ मलवे,किरण साठे, बसवराज निंबाळे, यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.