बार्शी – जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लायन्स क्लब बार्शी रॉयल, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपले मन, आपले वर्तन’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब बार्शी रॉयलचे अध्यक्ष ला. मंगेश बागुल होते. कार्यक्रमास प्राचार्य डॉ. ए. बी. कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कृष्णा मस्तूद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी डॉ. मस्तूद यांनी मनातील ताणतणाव, नकारात्मक विचार, भावनिक अस्थिरता, बदलते वर्तन आणि मानसिक आरोग्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अडचणींच्या काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, आपल्या भावना व्यक्त करणे आणि गरज भासल्यास योग्य व्यक्तीची किंवा तज्ज्ञांची मदत घेणे किती महत्त्वाचे आहे, यावर त्यांनी विशेष भर दिला.
प्रमुख पाहुण्यांची ओळख ला. कावेरी बागुल यांनी करुन दिली. सूत्रसंचालन ला. ज्योती रेवडकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आभार प्रा. महादेव ढगे सर यांनी मानले.
Post Views: 9